"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"
"नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच"
(व्याकरणामध्ये चुका झाल्या असतील तर समजून घ्यावे)
भांड्याला भांडे लागणारच
शब्दाने शब्द वाढणारच
ती त्याचे म्हणणे खोडनारच
तो एक शीवी हासडून बोलणारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||1||
वातावरण शांत होते न होते तेवढ्यात …… …
तीचे ओठात पुटपुटने होणारच
परत ह्याचा पारा चढणारच
मग काचेचा ग्लास कोणी फोडणारच
भरल्या घरात हे असे घडणारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||2||
मग ती थोडी पडती बाजू घेते न घेते तेवढ्यात ......
तो मागचे उकरून काढणारच
नुसता जीव तोडून भांडणारच
आगदी स्वतःच्याच लग्नाची जुनी पत्रीका फाडणाराच
नवऱ्याचा अहंभाव पुढे मांडनारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||3||
मग ती काही न बोलता स्वयंपाकघरात कणीक मळत बसते तेवढ्यात
तिचे मुसमुसून हुंदके होणारच
मग हा चोरून तीच्याकडे पाहणारच
थोडे त्यालाही वाईट वाटणारच
तोही एक आवंढा घोटणाराच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||4||
आता दोघेही शांत , शब्दही शांत… अगदी अनोळख्यासारखे… तेवढ्यात
तो हळूच तिच्याकडे जाणारच
लाडिक मीठीत घेणारच
तीही …. माफी मागणारच
भरल्या घरात हे अस घडणारच
नवरा - बायको म्हणले की हे असे होणारच ||5||
चान चान.
उत्तम निरीक्षण व कविता.
तीही …. माफी मागणारच- :angry
काही प्रमाणात सहमत आहे.
कविता आवडली....
कै च्या कै कविता! असो'
चं चं चं
नया हय वो..
तो एक शीवी हासडून बोलणारचहीच खरेच कविकल्पनाच आहे...........च !क्डव्याच्या शेवटी तेवढ्यातच
छान
शेवटापासून सुरवातीपर्यंत (उलट)
चुर्रर्र...चुर्र्र्रर...