हायकू -
पाठमोरी तू
सळसळणारी तू
मनात फडा . .
.
भिंतीला कान
कानात गोळा प्राण
वाद अबोल . .
.
एक मनात
दुसरेच जनात
हेही जिणेच . .
.
पान पिकले
मन हिरवटले
नसती नशा . .
.
गुलाबी गाल
उत्साहाची धमाल
वेळ गेलेली . .
.
वर्गीकरण
आवडले
वा वा
आवडले हायकू. छान
कविता छानच आहेत.