Skip to main content

हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/10/2013 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाठमोरी तू सळसळणारी तू मनात फडा . . . भिंतीला कान कानात गोळा प्राण वाद अबोल . . . एक मनात दुसरेच जनात हेही जिणेच . . . पान पिकले मन हिरवटले नसती नशा . . . गुलाबी गाल उत्साहाची धमाल वेळ गेलेली . . .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1254
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मायक्रो कविता. आवडल्या.

सुंदर, हायकू म्हणजे (माझ्यामते) व्यक्त होऊनसुद्धा काही अव्यक्त ठेवायचे, कमी शब्दांत सारे सांगण्याचा हव्यास न धरता काही शब्दांपलीकडले असते याची जाणीव करून द्यायची. तुमच्या हायकूतूनही ही अनुभूती मिळाली.

कविता छानच आहेत. पण ह्या हायकू किंवा त्रिवेणी या दोन्ही प्रकारात बसतात की नाही याबद्दल शंका. हायकू मध्ये एखादा छोटासा विशेषतः निसर्गाशी संबंधित असा प्रसंग असतो. त्यात भावना किंवा संवेदना प्रत्यक्ष शब्दांत व्यक्त केलेल्या नसतात. त्रिवेणीत असे काही बंधन नसले तरी पहिल्या दोन ओळी जे सांगतात, तिसरी ओळ त्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त करून देते. हायकूचे एक प्रसिद्ध उदाहरण - एक तळं... जुनाट... स्तब्ध एक बेडूक बुडी घेतो त्यात जराशी खळबळ आणि पुन्हा शांत (- शिरीष पै यांनी मात्सुओ बाशो यांच्या प्रसिद्ध हायकूचा केलेला अनुवाद) त्रिवेणी - मकरंद सावंत यांच्या काल चंद्र आला होता बराच वेळ गप्पा मारल्या आम्ही ... लोक वेडे आहेत, म्हणतात अमावस्या होती तरी तुमच्या कविताही फार आवडल्या.. अजून येऊद्यात.