(ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते..)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा सध्याचे 'मिपा वरचे प्रतिसादित विषय'
(कृपया सर्व जण हे विडंबन मजेत घेतील या बद्दल विश्वास आहे )
चाल : चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते
--------------------------------------------------------------------------
खेळीमेळीन लिहीत होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.!!
कौल लाविला मर्मस्थानी !
गाणं शिकुन लहानपणी !
इतिहास अभ्यासित होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !!
काथ्याकुटाला आला ग रंग
नाही आम्हा कवितेचं अंग
देव चरित्र सांगीत होते !
ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !!
आजी-काकूंचा घेऊ आशीर्वाद !
भयपटाचा धरला मी हात !
गुन्हेगाराला पकडित होते ग !
बाई मी प्रतिसाद खरडीत होते !!
--------------------------------------------------------------------------
मुळ गाणे-
चढाओढीने चढवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
काटाकाटीस आला ग रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
ग बाई मी पतंग उडवीत होते
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - लाखात अशी देखणी (१९७१)
वाचने
4675
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
शाब्बास!
In reply to शाब्बास! by मनस्वी
केस!:)
मस्त,
मस्त..
हाहाहाहाहाहा!
एकदम सही आहे! खासच!!
सहीच आहे कविता.
एकदम छान............
ही ही
विडंबन
मस्त
धन्यवाद !!