Skip to main content

(ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते..)

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 17/07/2008 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सध्याचे 'मिपा वरचे प्रतिसादित विषय' (कृपया सर्व जण हे विडंबन मजेत घेतील या बद्दल विश्वास आहे ) चाल : चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते -------------------------------------------------------------------------- खेळीमेळीन लिहीत होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते.!! कौल लाविला मर्मस्थानी ! गाणं शिकुन लहानपणी ! इतिहास अभ्यासित होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !! काथ्याकुटाला आला ग रंग नाही आम्हा कवितेचं अंग देव चरित्र सांगीत होते ! ग बाई मी प्रतिसाद वाचीत होते. !! आजी-काकूंचा घेऊ आशीर्वाद ! भयपटाचा धरला मी हात ! गुन्हेगाराला पकडित होते ग ! बाई मी प्रतिसाद खरडीत होते !! -------------------------------------------------------------------------- मुळ गाणे- चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते ग बाई मी पतंग उडवीत होते काटाकाटीस आला ग रंग हसू फेसाळ घुसळीत अंग दैव हारजीत घडवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा एक पतंग येई माघारा गेला गुंतत गिरवीत गोते ग बाई मी पतंग उडवीत होते गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - सुधीर फडके स्वर - आशा भोसले चित्रपट - लाखात अशी देखणी (१९७१)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4681
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

शाब्बास अमोल! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

In reply to by मनस्वी

मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. * एक विचारू मनस्वी? विवेकानंद केस बारीक कापत असत की लांब (>३ इंच) ठेवत असत? :) माझा मुद्दा हा की माणसाच्या केसांचा आणि विचारशक्तीचा काय संबंध?

मस्त कविता...! अभिनंदन केळकरसाहेब...! आपला, (पतंगप्रेमी) तात्या.

आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद अमोल गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा