Skip to main content

( अजोबांची काठी )

लेखक अमोल केळकर यांनी बुधवार, 16/07/2008 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
'गुळाचा गणपती' या चित्रपटातील पं. भिमसेन जोशी यांनी गायलेले माझे अतिशय आवडते गाणे ' इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ' त्याच चालीत पण एका वेगळ्या शब्दात मांडायचा प्रयत्न ----------------------------------------------------------------------- अजोबांची काठी, घेऊन चालती साथ देती काठी, संध्याछायी !! अजोबांचा नातू, खेळतो काठिनं, धावती उत्साहानं, मागे पुढे.!! मागे पुढे दाटे आठवणींचा मेळ कुटुंबाला आधार आजोबांचा !! सोडुन राहिले पाश तेची सर्व निवृत्ती- वेतन, आजीबाई !! -------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव नाचती वैष्णव, मागेपुढे मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई गीत - ग. दि. माडगूळकर संगीत - पु. ल. देशपांडे स्वर - पं. भीमसेन जोशी चित्रपट - गुळाचा गणपति (१९५३)
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4891
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

इंद्रायणी काठी ....फारच सुंदर गाणे आहे. विडंबनाने तेवढी मजा नाही आणली. बाकी -- अजोबांची काठी, घेऊन चालती साथ देती काठी, संध्याछायी !! अजोबांचा नातू, खेळतो काठिनं, धावती उत्साहानं, मागे पुढे.!! या ओळी जमल्या आहेत. तुमच्या या विडंबनावरून लहानपणी वाचलेली ही कविता आठवली -- आजोबांची काठी घोडा घोडा , आजोबांच्या मिशा ओढा ओढा खुशीतले आजोबा घेतात गालगुच्चा मलाच म्हणतात लबाडलुच्चा--- ईश्वरी

In reply to by ईश्वरी

आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !! पुढच्या वेळेला काळजी घेईन. ( शिकाऊ विडंबनकार ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केळकरसाहेब, नेहमी येते तशी मौज या टायमाला काही आली नाही! असो, पुलेशु... तात्या.

अजोबांची काठी, घेऊन चालती साथ देती काठी, संध्याछायी !! मस्त !!!

केळकर साहेब काही मजा आली नाही. सुधारणेला खूपच वाव आहे