Skip to main content

निळारंभ

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 24/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
हे निळारंभ मुक्तसे काही मला खुणावे बोलेल जरी मजपाशी मन करीन मोकळे ll १ ll माझ्या उरात दाटे व्यथा बरे कशाची करतील दूर काय तिज मेघ सावळे ll २ ll बोलू कसा तयाला? जीव आर्त गुदमरे संकेत विहंग सांगे घे भरारी अवखळे ll ३ ll मी बोलता जरासा तोही भरून आला तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे ll ४ ll हा पाऊस आसवांचा वाहून हर्ष त्याला मी ही भिजून चिंब दु:ख सारे निमाले ll ५ ll - सार्थबोध
लेखनविषय:

वाचने 1699
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मी बोलता जरासा तोही भरून आला, तळमळ झुगारुनी तो विजेत विरघळे हे खुप छान साधलंय !

वाह सुरेख -गुरुचरण