.
सखे,.. "राधिके"!.. दिसतो शोभून, तुलाच..
निळा साज,
निळी ओढणी..
निलम हार
सखे,.. "राधिके"!.. दिसशी शोभून, तूच
खेळता रंग रास,
निळे निळे तन..
निळे निळे मन
सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुलाच
अधीर चाल,
धावत जासी..
हरवू भान
सखे,.. "राधिके"!.. दिसते शोभून, तुझेच
तल्लीन ध्यान
निळी मोहिनी
निळा ध्यास
सखे,.. "राधिके"!.. दिसतो मजला, तुझ्यातच
घनश्याम
निळी बाहुली
दंग निळ्यात
=======================
स्वाती फडणीस............... १०-०७-२००८
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1819
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
आभार
स्वाती