मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्माचरण

Bhagwanta Wayal · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥धृ॥ जनांसंगे गेलो देवा तिर्थ यात्रेला । दगडच्या मुर्तिमध्ये तुला शोधियेला। नाही भेटलास तिथं झालो मी रे दु:खी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥१॥ उपवास केले नाना नवस सायास । लागला ना कधी देवा तुझा निजध्यास। मंदिरात जाऊनिया नाही झालो सुखी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥२॥ ऐकले मी कीर्तन कथा प्रवचन । आवरेना तरी माझे चंचळ मन । केले अवगुण ते ही चातुर्याने झाकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥३॥ वाचले ग्रंथ पोथ्या केले पारायण । नाही कळ्ले तरी कोठे आहे नारायण। भक्तिच्या नावावर केली फेका-फेकी । आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥४॥ राम नाम राहो देवा सदा माझ्या मुखी। आयुष्य हे निघोनिया गेले फुका-फूकी॥

वाचन 2309 प्रतिक्रिया 0