Skip to main content

॥स्तवन धरणीमातेचे ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 22/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली । शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला । एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी । सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला । सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते । स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला । गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा । भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला । उत्तम बीजे सुपिक माती । अन्न धान्य ही विपुल होती । जीवन देते सकळ विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला । कितेक धातु लहान मोठे । तेलाचेही अनंत साठे । तिच्या अंतरी ही सर्व कला । नमस्कार माझा धरणीमातेला । अनेक जंगले विशाल कुरणे । कित्येक नद्या कित्येक धरणे । पाणी पुरविते सर्व विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला । नव खंडाची वसुंधरा ही । सकळ प्राणी मात्रांची आई । आधार देते समस्त जीवांला । नमस्कार माझा धरणीमातेला ।
लेखनविषय:

वाचने 940
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले । विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।

नव खंडाची वसुंधरा ही । सकळ प्राणी मात्रांची आई । आधार देते समस्त जीवांला । नमस्कार माझा धरणीमातेला ।