Skip to main content

आता तरी मानवा सावध होशील का ?

लेखक शिवप्रसाद यांनी गुरुवार, 10/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आता तरी मानवा सावध होशील का? मानवतेच्या धर्माला जागशील का? चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले । तुझ्या रूप-गुणांसी भुललास का? आता तरी मानवा सावध होशील का? विश्वामध्ये सर्व जीव अज्ञानी । म्हणुनी तुजला केले बुद्धीमानी । परी चाले तुझीच मनमानी । तुझ्या निर्मात्यास तूच न मानी । जन्मदात्यास तरी तू मानशील का? आता तरी मानवा सावध होशील का? जगी धर्म श्रेष्ठ मानवतेचा । परी विसर पडिला तुला त्याचा । वादामध्ये शिनवलि व्यर्थ वाचा । महिमा कळला नाही सत्याचा । असत्य सोडून देशील का? आता तरी मानवा सावध होशील का? आपण सारी ईश्वराची लेकरे । आपसात भेदभाव, हे नाही खरे । हेवे दावे विसरुनी जा सारे । मगचि कळे मानवता तुझला रे | आपपर भाव तू सोडशील का? आता तरी मानवा सावध होशील का? संत उपदेश तू मानावे । प्राणीमात्रांवर प्रेम करावे । मनातील विकार सोडुनि द्यावे । मानवतेच्या मार्गावरी तू चालावे । ईश्वराचे स्वप्न साकार करशील का? आता तरी मानवा सावध होशील का?
लेखनविषय:

वाचने 1972
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

खुप मस्त!! डोळ्यात अंजन घालणारी रचना.

चराचर नि जीव ईश्वरे निर्मिले । त्यामध्ये बुद्धिमान कोणी न दिसले । ईश्वराने मग ध्यान लाविले । मानव रूप आकारासी आले ।
आम्ही तर "देव दानवा नरे निर्मिले" अशीही कविता वाचली आहे. त्याहीपुढे जाऊन आम्ही असंही वाचलं आहे की देव आहे अशी कल्पना असली तरीही ही कल्पनाच माणसाला संकटाला सामोरं जाणयाचं बळ देते. काय खरं मानायचं राव? जोक्स अपार्ट, चांगला प्रयत्न आहे कविता करण्याचा. पण कुठेतरी ऐकलेलं माझं एक आवडतं वाक्य लिहावंसं वाटतं, "किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही, तमाशाने तो बिघडला नाही. या दोन्हींचा आस्वाद घेत तो आपल्या चालीनं पुढं जात राहीला." अशा "माणुसकीने वागा" सांगणार्‍या कविता वाचून माणसं सुधारली असती साने गुरुजींच्या "खरा तो एकची धर्म" नंतर सारा महाराष्ट्र सज्जन होउन गेला असता.

In reply to by धन्या

@
"किर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही, तमाशाने तो बिघडला नाही. या दोन्हींचा आस्वाद घेत तो आपल्या चालीनं पुढं जात राहीला."
>>> हॅट्स ऑफ ........... जोरदार फेटा उडवण्यात येत आहे... !!!

मानव सर्वांत श्रेष्ठ ही मानवाचीच कल्पना आणी त्याचाच अहंकार ! बाकी
वादामध्ये शिनवलि व्यर्थ वाचा
हे पटलं मनोमन ! तुमचा भाबडा भाव काव्यापे़क्षा जास्त आवडला असेच लिहित रहा , कळकळीने !

सर्वांना धन्यवाद धनाजीराव, आपल्या मार्मिक विश्लेषण खुप चांगले आहे. यावर खुप काही बोलण्यासारखे आहे.