कितीक दिवस हे दुरुन दुरुन पहाणे
मनातिल गुपीते सारीत सारीत बोलणे
सोंग हे पांघरुन
गुज मनी दडवून
उगीच उगीच हासणे
कितीक दिवस हे...
हले ना ओठ जरी भाषेचा आड काही लपत्ये
श्वासांची माळ तुझी कुणाचे नाव उरी जपत्ये,जपत्ये,जपत्ये
कसल्याशा कळेला दाबीत दाबीत जगणे
कितीक दिवस हे...
सुनेसे गाव जसे, मनात भाव तसे दाटले
भवती भिड जरी,एकटा जीव असे भासले,भासले,भासले
आपुल्याच जीवाला जाळीत जाळीत रहाणे
कितीक दिवस हे...
फुटु दे बांध आता, मुखाचे बंध से सुटू दे
भारला सूर उरी, जाऊ दे पार नभी भिडू दे, भिडू दे, भिडू दे
हवे हवे असताना टाळीत टाळीत वागणे
कितीक दिवस हे...
गीत -- कौस्तुभ आपटे
हे गाणे खालील लिंकवर ऐकू शकता
https://soundcloud.com/kaustubh-apte/kityek-divas-he-mp3
आवड्ल्यास https://www.facebook.com/AseSphuraveGeet या फेसबूक पेज ला जरू लाईक करा.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2612
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगतीक..
बराच वाचन झालेला आहे या विषयावर पण नेहमीच मनाला स्प्रषून जातो हा विषय.
आशा करते कि हे दिवस तुमच्यासाठी लवकरच संपतील.
छानच आहे आवाज कौस्तुभ .
छानच आहे आवाज कौस्तुभ .
खुप खुप शुभेच्छा .
कितीक दिवस हे दुरुन दुरुन
कितीक दिवस हे दुरुन दुरुन पाहणे.
+१
In reply to कितीक दिवस हे दुरुन दुरुन by श्री गावसेना प्रमुख
स्मायलीनी भयंकर हसवलंय-अजून हसतोय.
ही ही ही
In reply to +१ by १००मित्र
ही ही ही
सर्वांचे धन्यवाद !
सर्वांचे धन्यवाद !
एक खुस्पटवजा सूचना-
एक खुस्पटवजा सूचना- रसभंगाबद्दल आगाऊच माफी मागतो. "लपत्ये", "जपत्ये", यांऐवजी "लपते", "जपते", अशी रूपे वापरल्यास वाचताना जरा बरे वाटेल.
लपत्ये
In reply to एक खुस्पटवजा सूचना- by बॅटमॅन
लपत्ये, जपत्ये यांचा वाचताना उच्चार 'अपत्ये' सारखा करावा म्हणजे आणखीन बरे वाटेल.
फक्त लय भारी
In reply to लपत्ये by तिमा
फक्त लय भारी
अपत्ये लै खुपत्ये
In reply to लपत्ये by तिमा
अपत्ये लै खुपत्ये ;)
सरळ लपत आहे, जपत आहे असा करावा मग बरेच काही वाटेल.
@अपत्ये लै खुपत्ये>>>ए. मी
In reply to अपत्ये लै खुपत्ये by अभ्या..
@अपत्ये लै खुपत्ये>>>ए. मी नाही मी नाही मी नाही(पाठिंबा देणार) :-))
हा कवि :-p आमच्या रायगड जिल्ह्यातिल असावा. भाषेचं हे वळण तिथलच ;-)
(अपत्ये) लेकुरे उदंड झाली |
In reply to लपत्ये by तिमा
(अपत्ये) लेकुरे उदंड झाली | तों ते लक्ष्मी निघोन गेली || असे रामदासांनी म्हटल्यामुळे देवाघरचा फूलबगीचा नको वाटून र्हायला आहे ;)