Skip to main content

दवबिंदू..!

लेखक वेणू
बुधवार, 18/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मी व्यर्थसा दवबिंदू पानावर गोठलेला, धरणीला जो नकोसा आकाशाने त्यागलेला..! तुज रुपवान भासे, मज भासे, मी अभागी उदास घुसमटतो, थिजतो, बसल्या जागी...! क्षणभंगूर सारे काही जाणतो आपण सारे, देखणे दिसणे फक्त हे जगणे आहे का रे..? पानावर ओल्या ओल्या मी खिन्नसा बसलेला टिपेल का मज कोणी, आशेवर बेतलेला.. मज नाते ना रुचते ना जमते बिलगाया, थिजणे संपून जावे वाटे जन्म नवा घ्यावा! जिथे स्वैर मी असावे अलगद मी रुजावे, अन् माझ्या रुजण्याने जन्म नवे उमलावे.. ही इच्छा अधू आहे ही आसही कोरी कोरी, मज ठाव आहे सारे जन्म, ना कोणी उद्धारी! घे जगून संपतो आहे मी मिथ्या जगलो आहे, इच्छा लपेटून सार्‍या जागीच विरतो आहे! माझ्या रूपाने जिंकले तुज पुरते मोहवले, पण जाण जगा, तू ही मी जगलो थिजलेले!! मी जगलो थिजलेले... -वेणू
लेखनविषय:

वाचने 3019
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सुंदर रचना! खुप आवडली.
माझ्या रूपाने जिंकले तुज पुरते मोहवले, पण जाण जगा, तू ही मी जगलो थिजलेले!!
व्वाह!!

थोडी निराशावादी वाटली, पण कविता चांगली आहे.

In reply to by चैतन्य दीक्षित

निराश, उदास वाटलं.

थोडी निराशावादी वाटली, पण कविता चांगली आहे.

नितांत सुंदर कवीता... "जिथे स्वैर मी असावे अलगद मी रुजावे, अन् माझ्या रुजण्याने जन्म नवे उमलावे.. ही इच्छा अधू आहे ही आसही कोरी कोरी, मज ठाव आहे सारे जन्म, ना कोणी उद्धारी!" स्वप्नांणा वास्तवाची झळ, मग खरं सत्य काय आहे. जे डोळ्यांना दिसत की जे आसंवात भिजंत. जे स्वप्नात फुलतं की जे वास्तवात जळतं. जे मनांत उमलुन डोळ्यात विरंत की जे मन मारुन जगताना झूरंत... कवीता खरंच अप्रतीम...

छान

दवबिंदु कडे दुसर्‍या अँगल ने बघुन तुला कविता जमेल का? तशी जमली तर नक्कि कर ..कारण दवबिंदुकडे पहाण्याचा बहुतेकांचा द्रुष्टिकोण नितळ असतो .... ट्राय कर ...विनंती समज हव तर ....