Skip to main content

माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते

लेखक रसप यांनी रविवार, 10/06/2012 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते माझ्या दु:खाने माझे अंगण कधीच न्हाले होते मी कोरडवाहू मातीमध्ये बाग फुलवला हसरा तू फुले वेचता केवळ काटे मला मिळाले होते क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते आयुष्य असावे कसे मला ही जाणिव झाली जेव्हा तोपर्यंत 'जीतू' जीवन माझे जगून झाले होते ....रसप.... १० जून २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_10.html
लेखनविषय:

वाचने 1983
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

धन्यवाद! गझलच्या भाषेत त्याला 'तखल्लुस' म्हणतात. कवी आपलं नाव 'तखल्लुस' म्हणून शेवटच्या शेरात गुंफतो. ह्या शेराला 'मक्ता' म्हणतात. मी 'जीतू', 'जीत', 'जितू' असे तखल्लुस घेत असतो.

मस्त आहे गझल आवडली. माझेच घर टाळून नभातून मेघ निघाले होते सुंदर आहे एकदम ही ओळ. मतल्यामुळे माझ्या काही ओळी आठवल्या
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

क्षण एक जरासा थांब जीवना तुला न्याहळू दे ना पाऊल तुझे अन माझे सोबत कधी न आले होते>> अतीव सुंदर! मी डोक्यावरती छप्पर येण्यासाठी धडपड केली अन पायाखाली जमीन येता सर्व उडाले होते>> अहाहा..! अप्रतीम शब्द गुंफलेत, फार आवडला हा शेर! धन्यवाद!!

काही काही ओळी फारच छान आल्या आहेत!