Skip to main content

उत्सव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 04/06/2012 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वच्छ किनारी हिरव्या दारी नभी खगांची सोनभरारी आकाशी विरघळे चांदवा दिवस; उषेच्या दरबारी पुनव जशी; शीतल अंबारी स्वप्न पापण्यांच्या मखरी ओतप्रोत गाण्यांच्या लहरी जळ; प्रतिमेच्या गाभारी गोड पिसे स्वच्छंद अंबरी दिसे दूरचे जवळ उरी उत्सव हा जुळल्या धाग्यांचा रोज असावा संसारी .............................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1431
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

गेय आणि स्वप्नील.

पुनव जशी; शीतल अंबारी स्वप्न पापण्यांच्या मखरी ओतप्रोत गाण्यांच्या लहरी जळ; प्रतिमेच्या गाभारी
क्या बात!!

स्वच्छ किनारी हिरव्या दारी नभी खगांची सोनभरारी आकाशी विरघळे चांदवा दिवस; उषेच्या दरबारी एकदम मस्त