Skip to main content

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

Published on 26/04/2012 - 05:15 प्रकाशित मुखपृष्ठ
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते प्रेरणा शेजारचा पोरगा हा मला पाहूनीया जातो पाहूनीया माझ्याकडे गालात हसूनीया घेतो काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते रोज रोज काहीतरी नवे नवे बहाणे बनवी कधी पेपर घेई कधी नवी रिंगटोन देई त्याच्या मनामध्ये काय आहे कसे समजावे काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते काल मी गॅलरीत केस वाळवीत होते उन्हामध्ये थांबून मी समोर बघत होते म्हणतो त्याच्या परिक्षेचा निकाल परवा आहे काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते त्याने माझा फेसबूक आयडी विचारला मी त्यावेळी त्याला रिअल आयडी दिला ऑनलाईन जावे की न जावे प्रश्न मला पडे काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते उसके मन मै क्या है मै कैसे समझू क्या होता है मेरे दिल मे उसे कैसे बतावूं आग लगी है दोनो तरफ उसे बुझावू मै कैसे काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते कुणीतरी माझ्या मदतीला का येईल मनातला निरोप माझा त्याच्या कानी देईल पण नको उगीचच मी का पुढाकार घेते काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते पुर्वप्रकाशित - पाभे

याद्या 1603
प्रतिक्रिया 4

हां... अता गीतकार शाहिर-पाषाणभेद परत आल्यासारखे वाटले. गाणं वाचुन टिन एजच्या लै जुन्या अठवणी जाग्या झाल्या आणी त्यामुळे ही प्यार की पेहेली झलक पण अठवली ;-) चला,आजच्या दिवसभर लै गार गार वाटणार ;-)

या कवितेला साजेसा एक व्हिडियो- नॅन्सी अजरम हिचा- बहुतेक आहे. सापडल्यास पाठवेन.

गावाकडे रीक्षांमध्ये वाजवल्या जाणार्‍या गाण्यांच्या चालीत म्हणून पाहीलं, मीटरमध्ये बसतंय. ;) वेसावकरांच्या कोळीगीतात आरामात खपून जाईल. :)