Skip to main content

स्पंदन

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/04/2012 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
एकांत; क्षणाच्या भवती क्षण; उभा जणू की सवती द्वय पाश; लटकती नाती मन अस्थिर झोक्यावरती वाटे जग सारे हलते पण तिथेच स्थित ते असते फांदीवर गोत ऋणांचे मातीवर पाउल नसते पेटत्या अजून मशाली वार्‍यावर प्रतिमा झुलते कधि दूर दूरचे दिसते हृदयी स्पंदन काहुरते ..........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1060
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

वाटे जग सारे हलते पण तिथेच स्थित ते असते फांदीवर गोत ऋणांचे मातीवर पाउल नसते
_/\_ भन्नाट!!