व्यर्थ जाळले शब्द
धुरात त्यांच्या चुरचुरले नाही डोळे
अंधार दिला भाड्याने अशा
चेहऱ्यावर मिणमिणत्या खिडक्या...
(म्हणे) व्यर्थ आहेत शब्द
ज्याला सुराची साथ नाही
मस्तवाल रसिकतेला त्यांच्या
विषाचा तिरकट दात आहे....
सजवायला ? बघा दुसरे
शब्द ना माझे गुलाबचंदी
अघोर साधनेत ह्यांच्या
काळिजे कोवळी कटणार आहेत
व्यर्थ तुमची भीक
माझ्या हात काटलेल्या शब्दांना
संगमरवरी ताज त्यांनी
केव्हाच बांधला आहे.
----
पुर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1505
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
पेशवा..., या कवितेचा अर्थ
ए क
पुन्हा एकदा शाट काही कळले
परा,
In reply to पुन्हा एकदा शाट काही कळले by परिकथेतील राजकुमार
इथे आपण जळकट लोकांनी कितीही
हम्म्म
In reply to इथे आपण जळकट लोकांनी कितीही by कवितानागेश
मला वाटते पेशवाईत झालेल्या
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
ताजमहालाच्या बांधकामासाठी तैनात केलेल्या मजूराच चित्र