Skip to main content

व्यर्थ शब्द

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 20/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
व्यर्थ जाळले शब्द धुरात त्यांच्या चुरचुरले नाही डोळे अंधार दिला भाड्याने अशा चेहऱ्यावर मिणमिणत्या खिडक्या... (म्हणे) व्यर्थ आहेत शब्द ज्याला सुराची साथ नाही मस्तवाल रसिकतेला त्यांच्या विषाचा तिरकट दात आहे.... सजवायला ? बघा दुसरे शब्द ना माझे गुलाबचंदी अघोर साधनेत ह्यांच्या काळिजे कोवळी कटणार आहेत व्यर्थ तुमची भीक माझ्या हात काटलेल्या शब्दांना संगमरवरी ताज त्यांनी केव्हाच बांधला आहे. ---- पुर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 1505
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

छान.

पेशवा..., या कवितेचा अर्थ तुंम्हाला स्वत:ला नक्किच माहित असेल. कृपया तो इथे सांगा. :-)

ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ. :( मिकाला अर्थ कळलाय. सांग रे!

पुन्हा एकदा शाट काही कळले नाही !
पुर्वप्रकाशित
म्हणजे कुठून तरी उचलून इथे आणून टाकले आहे येवढेच कळाले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपण वापरलेल्या शब्दाचा अर्थ `व्यर्थ' (किंवा निरूपयोगी) असा आहे. कवीनं ते शीर्षकातच (`व्यर्थ शब्द') म्हटलय त्यामुळे अनावश्यक द्विरूक्ती झाली आहे असे आपल्याला वाटत नाही का?

इथे आपण जळकट लोकांनी कितीही व्यर्थ प्रतिक्रिया दिल्या, तरीही ....................असेच काहीबाही होउन............................. त्या सगळ्या फायनली 'ताज' खाली गाडल्या जाणार आहेत!

In reply to by परिकथेतील राजकुमार

मला वाटते पेशवाईत झालेल्या कवितांवर प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांची बोटे छाटून टाकायला हवीत ! माझ्यासह‍ित !

कवी रंगवतोय: >"व्यर्थ तुमची भीक संगमरवरी ताज त्यांनी केव्हाच बांधला आहे, माझ्या हात काटलेल्या शब्दांना विषाचा तिरकट दात आहे" ( ताजमहाल बांधून झाला पण मजूरी मिळालेली नाही आणि वर हात कलम केले, आता भीक तरी कशी मागणार?) >..."अंधार दिला भाड्याने (म्हणजे शहाजानाने) अशा मस्तवाल रसिकतेला त्यांच्या, अघोर साधनेत ह्यांच्या" (इथे दारूण दु:खामुळे द्विरूक्ती आहे. अघोर साधनेत `ह्यांच्या आयला'! असं खरं तर कवीला म्हणायच होतं पण ते मिटरमधे बसत नाही) >सजवायला ? बघा दुसरे (आता आम्ही इंटीरिअरचं काम करणार नाही, तुम्ही दुसरे मजूर बघा) >चेहर्‍यावर मिणमिणत्या खिडक्या... (लाईट बील भरायला पण पैशे नाहीत) >व्यर्थ जाळले शब्द, धुरात त्यांच्या चुरचुरले नाही डोळे (शहाजहान बोलवायला यांच्या घरी आला होता तेव्हा कवीच्या घरात (कवितेच्या वह्या वापरून) चुलीवरचा स्वयंपाक चालू होता पण त्याचे डोळे जरा देखील चुरचुरले नाही) >(म्हणे) व्यर्थ आहेत शब्द ज्याला सुराची साथ नाही (शहाजान म्हणाला बरं केलस, असल्या कवितांचा दुसरा काहीच उपयोग नव्हता) >शब्द ना माझे गुलाबचंदी त्या वेळी सोनाचांदी च्यवनप्राश गुलाबचंदी म्हणून प्रसिद्ध होता पण कवीला खायचे वांदे तर च्यवनप्राश काय परवडणार? >काळिजे कोवळी कटणार आहेत शहाजानच्या असल्या वागण्यानं कवीच्या कोमल हृदयाला धक्का बसला आहे. पेशव्यांनी सर्व रसिकांना `तुम्हाला वाटेल तो अर्थ' अशी मुभा दिल्यान आम्ही आम्हाला समजलेला अर्थ दिलाय.