विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले ..
आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
-------------------------------
कधी दूर - दूर कधी तू समोर ..
भात तुज भरवते आज हा ?
खा हे कसे ,नाहि तसे
हा घास लागे जीवा..
कशी सावरू मी आवरू रे तुला ?
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला
खा घास हा, खा घास हा..
का छळतो मला ,छळतो मला
खा घास हा..................
क्षणात सारे ,चिमन पाखरे.. झुळूक होऊनी जाती..
कधी दूर तू ,कधी हळुच जवळ वाटे
पण भाताखेरीज माझ्या, काहीच नाही हाती .....
मी अशीच बोलते, उगीच रागावते
पुन्हा तुला बोलवते ..
मग उठुन थोडे तुला भरवते
तुझ्याच साठी फिरते ...
तू असताना रोजचाच खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
खा घास हा ........
मनात माझ्या हजार शंका
तुला मी जाणून आहे
तू असाच आहेस , तसाच नाहीस
डांबिस असा तू खरेच आहे
तू इथेच बस ना ,हळूच हास ना
असाच हवा मला तू ..
पण माहित नाही मलाही अजुनी ..
भात तसाच आहे का अजुनी ?
नवे रंग सारे , रोजचे हे पसारे तरी ..
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला
खा घास हा ...................
खा घास हा ,खा घास हा
तु छळतो मला ,छळतो मला
खा घास हा..................
----- शब्दमेघ
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3562
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविवर्य गणेशा यांनी कुठल्या
घ्या आता खुद्द महाराजांनीच "
In reply to कविवर्य गणेशा यांनी कुठल्या by प्रचेतस
कुणाच्या तरी ख.व.मध्ये याचा
In reply to घ्या आता खुद्द महाराजांनीच " by गणेशा
[:)]मुंबई मध्ये पार्ल्याला
In reply to कुणाच्या तरी ख.व.मध्ये याचा by प्रास
माझेही आवडते गाणे
In reply to [:)]मुंबई मध्ये पार्ल्याला by गणेशा
गणेशा नि गवि,
In reply to माझेही आवडते गाणे by गवि
विडंबन छान पण तुमच्या या
In reply to कविवर्य गणेशा यांनी कुठल्या by प्रचेतस
पण तुमच्या या विडंबनामुळ
In reply to विडंबन छान पण तुमच्या या by पियुशा
घ्या वास हा.
हसुन हसुन पुरेवाट .. वल्ली
In reply to घ्या वास हा. by प्रचेतस
@कधी दूर - दूर तर कधी समोर
In reply to घ्या वास हा. by प्रचेतस
विडंबनसम्राट वल्लि महाराज की
In reply to @कधी दूर - दूर तर कधी समोर by अत्रुप्त आत्मा
मस्त
कोणत्या गाण्याची विडंबनं