<<<<आज बसावे उद्या बसावे >>>
कच्चा माल : http://www.misalpav.com/node/20177 (सोनलताईंची माफी मागुन )
आज बसावे उद्या बसावे
दोन थेंब सांडुन देणे
डोक्यामध्यल्या शॉटालाही
सोडुन द्यावे जमवुन प्यावे
दोन पेयपांनांच्या मधले अंतर
आहे केवळ झुरत राहणे
कसे कळावे खुळ्या जगाला
सांजकाळीचे बहकुन येणे
ग्लास मद्याचे असेच ताटवे
त्यात बुडावे दिसावे काजवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती बरळत जाणे
सिगारेटीचे वलय खेळावे
नको मेंदुशी फाटे फोडणे
तंदुरीचे चिकन घेउनी
संध्या काळी आपले बसणे
दारू, बायको किंवा बायकोच्या
हे घ्या !! प्रेरणा ::
आज बसावे उद्या बसावे
अरे!
हेच म्हणते!
झकास रे !
ही कविता वाचुन असे मत
जास्ती बसू नका बुडाला बेंड