Skip to main content

शाळा.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 05/06/2008 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा..... लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात आकांक्षांचं पीक ऊरी , वारं भरल्या कानांत ! त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते ! कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी "गोल्ड्-स्पॉट्"च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी ! "मस्तीखोर" म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी ! तूप-साखर गेली आणि आता "ब्रेड्-बटर आलं पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं ! फक्त .....चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्‍या "बाई" आणि सुधारावं म्हणून मारणारे "सर" आता दिसत नाहित ! चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास "शाळार्थी" आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली "विद्यार्थी" दिसत नाहित ! मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय शिक्षकांचा "रोल" मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय ! तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे ! कारण हात उगारणारे सर किंवा बाई आता कदाचित नसतील , पण वर्गातल्या मुलाला लागलं म्हणून रडणारे एखादे तरी वर्गशिक्षक असतील ! मस्ती केली की ओणवं उभं करणारे सर दिसतीलच कशाला? "दमलं असेल पोरगं !" म्हणून पाणी देणार्‍या शिपायाची सर कशाला? एकही विषय न शिकवणारे असतील शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्गात फिरून शिकवण्याची दृष्टी नाही आता व्यापक ! नाममात्र अस्तित्व घेऊन गल्ली बोळांत हल्ली उभ्या आहेत इमारती 'कळलें नाही तर "क्लास"मधे विचारा' या शिक्षकांच्या इशारती ! तरी पण आवडते सगळ्याच मुलांना शाळा सोडा वॉटर सर्-बाई अन् चीर पडलेला फळा ! कारण चुकार फटीतून झिरपत असतं जसं पावसाचं पाणी, तसा फुलवत असतो एखादा शिक्षक,एखादा शिपाई ....हा मळा ! ------------------------------------------------------------------------------------गोखले एजुकेशन सोसायटी - बोरिवली पश्चिम - च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यानिमित्त २४-जुलै-'०७ रोजी केलेली आणि जाहीर वाचन झालेली एक कविता.....उदय गंगाधर सप्रे-ठाणे आपण मला इथेही भेटू शकता : कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आणि कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 5120
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया