मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साई -

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सोन्याचा मुकुट हिऱ्यांचा हार सोन्याच्या पादुका रत्नजडित सिंहासन सोन्याचे मखर सर्वांच्या डोळ्यांत ठसले त्या सोनेरी धामधुमीपासून दूर - - - - कोपऱ्यातल्या एका गरीबाच्या मिटलेल्या डोळ्यांतून ओघळणारे ... मोती ... फक्त साईलाच दिसले ; आणि (सोन्यापेक्षा सामान्यांवर माया जडलेले -) साई उदासपणे स्वत:शीच हसले !

वाचने 1179 वाचनखूण प्रतिक्रिया 4

मिसळलेला काव्यप्रेमी 12/11/2011 - 10:21
पाभेंची याच विषयावरील रचना इतक्यात वाचली. तुम्ही दोघे ठरवून लिहीता काय? ;) हिरे-माणीक, सोन्या-मोत्यांपलीकडले साई बघणे सगळ्यांना जमतेच असे नाही. कवीला हि विसंगती बोचली नाही तरच नवल!!

पैसा 12/11/2011 - 22:02
साईना सोन्याचे मुकुट घालणारे एवढा विचार कुठे करतात हो?