✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझ्या नजरेचा बाण !!

व — वपाडाव, गुरुवार, 10/20/2011 - 16:47
.... तुझ्या नजरेचा बाण, माझ्या दिलाची कमान , कधी करतो गं पार, याची मला नाही जाण ! ............... तुझी नाजुक ती डोळं, ............... रंग त्यांचा नीळाषार, ............... जेव्हा पाहती सावध, ............... होई मी तर घायाळ ! तुझी टपोरी ती अक्ष, त्यांचा तिरपा कटाक्ष, झाड - झुडुप न पक्षी, सर्व देती याची साक्ष ! ............... तुझी सरसर चाल, ............... झुकलेली ती नजर, ............... खुलवितो तुझं रूप, ............... तुझा साज श्रृंगार ! कोपर्यातुन डोळ्यांच्या, जेव्हा देतेस नजर, सखे वाजतोय तेव्हा, माझ्या दिलाचा गजर ! ............... आणि किती दिस सये, ............... आता खेळायाचा हा खेळ, ............... काही मुखातून बोल, ............... कर मन हे मोकळं ! तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण ! - काळे पुष्पक Kale Pushpak फार पुर्वी मराठी कवितावर प्रकाशित

प्रतिक्रिया द्या
7491 वाचन

💬 प्रतिसाद (42)

आहाहा... आहाहा... आहाहा...

मदनबाण
गुरुवार, 10/20/2011 - 16:51 नवीन
आहाहा... आहाहा... आहाहा... ;) शॉलिट्ट !
  • Log in or register to post comments

कविता छान ! कोपर्यातुन

गणेशा
गुरुवार, 10/20/2011 - 16:56 नवीन
कविता छान !
कोपर्यातुन डोळ्यांच्या, जेव्हा देतेस नजर, सखे वाजतोय तेव्हा, माझ्या दिलाचा गजर !
छान.
तुझी टपोरी ती अक्ष
अक्ष म्हणजे काय हे कळाले नाही, अक्ष म्हणजे नयन असा अर्थ आहे का ? अक्ष वरुन अक्स(प्रतिबिंब) आठवुन गेला.
  • Log in or register to post comments

अक्ष म्हणजे नयन रे

प्रचेतस
गुरुवार, 10/20/2011 - 17:22 नवीन
अक्ष म्हणजे नयन रे गणेशा, पुढची ओळ वाच ना -त्यांचा तिरपा कटाक्ष. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

जबराट

प्रचेतस
गुरुवार, 10/20/2011 - 17:11 नवीन
वप्या एकदम सही सही कविता रे.
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !
हे तर लैच भारी. अजून येउ देत.
  • Log in or register to post comments

तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला

धन्या
गुरुवार, 10/20/2011 - 17:17 नवीन
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !
सहीच !!! तोडलंस मित्रा !!!
  • Log in or register to post comments

मस्त... झकास... मनापासून

गवि
गुरुवार, 10/20/2011 - 17:20 नवीन
मस्त... झकास... मनापासून आलंय..
  • Log in or register to post comments

मस्त !!

मोहनराव
गुरुवार, 10/20/2011 - 17:26 नवीन
दिलखेचक कविता आहे..
  • Log in or register to post comments

धन्यवाद ....

वपाडाव
गुरुवार, 10/20/2011 - 17:31 नवीन
मदनबाण, मोहनराव, गवि, धना, वल्ली व गणेशा या सर्वांचे आभार !!!
  • Log in or register to post comments

व्वा व्वा!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/20/2011 - 17:38 नवीन
व्वा व्वा! वपा...चांगलाच...डाव केलात हो।
  • Log in or register to post comments

तोडलस!!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 10/20/2011 - 18:43 नवीन
तोडलस रे मित्रा!! ;) मस्त झाली आहे रचना.. आवडली...
  • Log in or register to post comments

काय वर्मी बाण मारलास गड्या!

पाषाणभेद
Fri, 10/21/2011 - 07:37 नवीन
काय वर्मी बाण मारलास गड्या!
  • Log in or register to post comments

फारच अप्रतीम.......... लय झाक जमलीय..................

लीलाधर
Fri, 10/21/2011 - 08:44 नवीन
फारच अप्रतीम.......... लय झाक जमलीय.................. कोपर्यातुन डोळ्यांच्या, जेव्हा देतेस नजर, सखे वाजतोय तेव्हा, माझ्या दिलाचा गजर ! ऐकून दिलाचा गजर, कधी होशील ह्जर, सखे तेव्हा होईल खरी दोघा॑ची नजरा नजर.................
  • Log in or register to post comments

धन्यवाद.....

वपाडाव
Fri, 10/21/2011 - 10:16 नवीन
वाह !! छानच की....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

वप्या, 'वयात आलास' हे बाकी

प्यारे१
Fri, 10/21/2011 - 09:03 नवीन
वप्या, 'वयात आलास' हे बाकी चांगलं केलंस बरं.... ;)
  • Log in or register to post comments

व्वा!!

मी-सौरभ
Fri, 10/21/2011 - 09:33 नवीन
या अप्रतिम कवितेला साजेसा एक फटू ईथे डकवू का रे वप्या??? त्या फोटोने तू वयात आलायसं हे पण सिद्ध होईल ;)
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

किसन शिंदे
Fri, 10/21/2011 - 10:22 नवीन
तो नाणेघाटातल्या ट्रेकमधला फोटो का रे? ओढ्यात काढलेला?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

व्वा!! छुपे रुस्तम!!

किसन शिंदे
Fri, 10/21/2011 - 09:34 नवीन
व्वा!! छुपे रुस्तम!!
  • Log in or register to post comments

साजेसा असा फोटू

lakhu risbud
Fri, 10/21/2011 - 10:35 नवीन
साजेसा असा फोटू (पुणेरी हिरवळीचा) डकवला तर कविता दृश्य पण होईल. बाकी दिवाळी च्या काळात अशा अजून फराळाची अपेक्षा.
  • Log in or register to post comments

झकास....

मन१
Fri, 10/21/2011 - 10:55 नवीन
कट्ट्यावर बसून पोरापोरांत गप्पा हाणताना एका वाफाळत्या कटिंग चहा सोबत कॉलेजवयीनाने आपल्या लाडक्या चालत्याफिरत्या महालाचे केलेले वर्णन वाटले. एक शंका:- इथले प्रतिसाद पाहून हा धागा "Gents only" आहे काय अशी शंका आली.
  • Log in or register to post comments

आवतन

वपाडाव
Fri, 10/21/2011 - 11:12 नवीन
एक शंका:- इथले प्रतिसाद पाहून हा धागा "Gents only" आहे काय अशी शंका आली.
मी अजुन लेडीज मिपाकरांना आवतन दिलेले नाही... म्हुन कदाचित त्या मागे राहिल्या असतील.... बोलावुन आणतो आता एकेकीला.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

दिलाचा गजर -

विदेश
Fri, 10/21/2011 - 11:16 नवीन
मस्त वाजत आहे , गाजत आहे , दिसत आहे दिलाचा गजर.. लवकर होऊ द्या नजरा नजर ! छान वाटली कविता.
  • Log in or register to post comments

अरे बाप रे मस्त रे ,व प्या

पियुशा
Fri, 10/21/2011 - 13:20 नवीन
अरे बाप रे मस्त रे ,व प्या ! बोले तो सोल्लीड है भाय :)
  • Log in or register to post comments

मस्त झाली आहे रचना.. आवडली...

अविनाशकुलकर्णी
Fri, 10/21/2011 - 13:31 नवीन
मस्त झाली आहे रचना.. आवडली...
  • Log in or register to post comments

प्रत्येकाची "ती" "तू" वेगळीच तरीही

आत्मशून्य
Fri, 10/21/2011 - 15:56 नवीन
शब्दातून अख्ख चित्र डोळ्यासमोर उभ केलस तीचं.... जबरा.
  • Log in or register to post comments

!!! Thanx n Happy Deewali !!!

वपाडाव
Fri, 10/21/2011 - 16:28 नवीन
वरील सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासुन धन्यवाद.... अन दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

छान नादमय रचना आहे. फक्त

मेघवेडा
Fri, 10/21/2011 - 16:57 नवीन
छान नादमय रचना आहे. फक्त "तुझा साज शृंगार" "आता खेळायाचा हा खेळ" या ओळींत मात्रांची ओढाताण होते आहे.
  • Log in or register to post comments

अर्रे वाचायची राहुन गेली होती

मृत्युन्जय
Fri, 10/21/2011 - 18:06 नवीन
अर्रे वाचायची राहुन गेली होती तुझी कविता. चांगली जमलीय. काय झाले मग त्या 'कटाक्षा'चे पुढे? ;)
  • Log in or register to post comments

अरे वा...लई भारी कविता करता

हरिप्रिया_
Fri, 10/21/2011 - 18:12 नवीन
अरे वा...लई भारी कविता करता तुम्ही... मस्त!!! आवडली...
  • Log in or register to post comments

धन्यवाद्स !!!

वपाडाव
Fri, 10/21/2011 - 18:17 नवीन
मेघवेडा, मृत्युंजय अन हरिप्रिया तिघांचेही आभार !!
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे तुझी टपोरी ती

प्रकाश१११
Fri, 10/21/2011 - 18:51 नवीन
छान लिहिले आहे तुझी टपोरी ती अक्ष, त्यांचा तिरपा कटाक्ष, झाड - झुडुप न पक्षी, सर्व देती याची साक्ष आवडले.मस्तच ..!!
  • Log in or register to post comments

वा रे वा!

पैसा
Fri, 10/21/2011 - 18:56 नवीन
कुठून बाण आला म्हणायचा हा?
  • Log in or register to post comments

धन्यवाद......

वपाडाव
Sat, 10/29/2011 - 00:55 नवीन
आपणा सर्व प्रतिसादकांचे मन:पुर्वक आभार..... आपल्या प्रत्येक कलाकृतीला येथुन पुढे एकेक प्रतिक्रिया मोफत देणेत येइल.... ;)
  • Log in or register to post comments

तुझा होकार ऐकिन्या,

प्रसाद गोडबोले
Tue, 12/22/2015 - 19:51 नवीन
तुझा होकार ऐकिन्या, जीव झाला सैरभैर, तुझ्या एका हाकेसाठी, माझं आयुष्य गहाण !
क्या बात है क्या बात है ! अप्रतिम कविता वपाडावजी !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो.

प्रचेतस
Tue, 12/22/2015 - 20:37 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

धन्स...

वपाडाव
Mon, 01/04/2016 - 18:03 नवीन
उ.पा. केल्याबद्दल खुप खुप आभार... कवितेतल्या ह्या ओळी मला सुद्धा सर्वात जास्त आवडतात…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मस्त!

DEADPOOL
Tue, 12/22/2015 - 20:07 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

मस्त मस्त....क्या बात है

अविनाशकुलकर्णी
Wed, 12/23/2015 - 13:37 नवीन
मस्त मस्त....क्या बात है
  • Log in or register to post comments

हल्ली कूट असता आपुन!? व

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/23/2015 - 15:44 नवीन
हल्ली कूट असता आपुन!? व पाडाव? ;)
  • Log in or register to post comments

शांताबाई

कपिलमुनी
Wed, 12/23/2015 - 18:12 नवीन
शांताबाई गाण्याची चाल परफेक्ट बसते आहे :)
  • Log in or register to post comments

त्यापेक्षा हुक्का बार ची चाल

अभ्या..
गुरुवार, 12/24/2015 - 00:24 नवीन
त्यापेक्षा हुक्का बार ची चाल परफेक्ट बसतीय. कभी आर कभी पार. तेरा प्यार प्यार प्यार हुक्का बार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हुक्का बार

कपिलमुनी
Wed, 01/06/2016 - 21:16 नवीन
होय की रे ! आत्ता म्हणून पाहिला ! वपाडाव , एखाद्या ट्रेक नाईटला म्हणानार ही कविता हुक्का बार स्टाईलमध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धन्स...

वपाडाव
Mon, 01/04/2016 - 18:06 नवीन
अकु, प्रचेतस, कपिल्मुनि, डेडपुल, प्रगो व अभ्या ह्या सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा