Skip to main content

(पीस)

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 20/05/2008 14:22 या दिवशी प्रकाशित केले.

मिलिंद फणसें  पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.

पाहिले मी काल, आवडलीस तू
काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू

अर्थ भलते लावले शब्दांतले
चंडिका होउन मग थरथरलीस तू

लोक जमले ऐकुनी आरोह तो
येव्हढे जोरात ओरडलीस तू!!

विस्कटूनी लावली माझी कुडी
ह्या 'घडी'साठीच ना टपलीस तू?

काल लाथांनी मला कुटला वरी
गूढ वर तू का पुन्हा हसलीस तू?

शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी?
ठेवला आहेस मज ओलीस तू!

मी असे लाचार नवरा शेवटी
शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू...

लेखनविषय:

वाचने 4009
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

लय भारी.. अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! सह्ह्ह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मानले बॉ तुला.... शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे...... लाख दंडवत रे तुला.

शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... एकदम दे दणादण! ;) चतुरंग

शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... जबरदस्त..... मदनबाण.....

मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... वा वा! सुंदर रे केशवा.... आपला, (मिपाकर) तात्या.

पाहिले मी काल, आवडलीस तू काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! हाहाहा (वाचक)बेसनलाडू

एकदम ढींचॅक......

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! क्या बात है!! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... मार डाला!!! मस्त!