Skip to main content

धर्मामिटर

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/06/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
===धर्मामिटर=== जसा असतो थर्मामिटर,तसाच असतो धर्मामिटर॥ध्रु॥ प्रत्येकाची श्रध्दा सुध्दा, प्रत्येकाचा असतो ताप। परलोकातला जायचा दोर,ईहलोकातला होतो साप॥ सापाला काबुत ठेवण्यासाठी,पाजा दुध दोन दोन लिटर...१... धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव। ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥ धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२... भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार। आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥ जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३... प्रत्येकाच्या जातिचं पाणी, जातं शेवटी समिंदरात। पण पहिल्यापासुन हऊसेनी भरतात,टाक्या मात्र घराघरात॥ पाण्याचं बाष्प करावयाला,सांगा लाऊ कोणता हिटर?...४... पराग दिवेकर...........
लेखनविषय:

वाचने 5021
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

भारतात धर्माला जातिच फार,प्रत्येक खाते दुसय्रावर खार। आधी मी तुला मारलं,...तर तू नंतर मला मार॥ जातीची गाडी खिळखिळी करायला,सांगा शोधू कुठला फिटर?...३... छान. फिटर सापडणे अवघड आहे.

"म्हणणं तुमचं असेल खरं, पण आमाला ते जमायचं नाय | जातीच्या भांडणांखेरीज, सत्तेचं लोणी गावत नाय || कशाला फुकाचा उपदेश राव, काढा पुढे तुमची स्कुटर...." :) (ह. घ्या.)

खरंय गुरुजी! सध्याच्या उन्मादी काळात तर हे अधिकच तीव्रतेने जाणवते. चला, धर्मामीटर लावून सध्यांचा 'ताप' किती डिग्री आहे बघा बरं.. :)

अरे वा, आत्मूगुर्जींची ही कविता माहितच नव्हती.

मस्त !

लय भारी ! तुमच्या प्रतिभेला दाद द्यायला वापरतो आहे तुमचाच मीटर :)

In reply to by अवतार

@तुमच्या प्रतिभेला दाद द्यायला वापरतो आहे तुमचाच मीटर >>> हहा हहा हहा हहा!!! जय हो अवताराबाबा की! :)

झकास जमलीये कविता गुर्जी

धर्माच्या दुधाला असतो भाव,बुडवुन खावा श्रद्धेचा पाव। ईहलोकी भांड जेवढं जड,तेवढाच बसतो आतुन ताव॥ धर्माची लांबी कधी पाच,कधी असते पंधरा मिटर...२...
अप्रतिम. हे कडवे तर खूपच आवडले.

In reply to by माहितगार

@धर्माची लांबी हे रुपक नीटसे उमगले नाही. >>> म्हणजे..जे लोक,धर्मामधे.. स्वतःला हवा असलेला बदल(सुधारणा नव्हे!) हवा तेंव्हा हवा तसा करवून घेतात..(आणि,तो ही धर्माचीच साक्ष काढून!) आणि एरवी मात्र धर्म अपरिवर्तनीय शाश्वत असतो..वगैरे बोलतात.. त्यांच्यासाठी हे रुपक आहे. म्हणजे एकिकडे एकादशीला सत्यनारायण नको..असं म्हणणारे..तोच स्वतःला करायची इच्छा झाली,की एकादशी म्हणजे पांडुरंग पांडुरंग म्हणजे विष्णू...म्हणजे तोच सत्यनारायण ..असा आ..धार-काढून हवा तसा धर्म लांबवतात..तेच मत उलट लावत एखाद्याचा सत्यनारायण थांबवतात...धर्माची लांबी कमी करतात... :)

डुकरांशी कुस्ती खेळल्याने , डुकराला काहीच नसतो पडत फरक, तसेच काहीसे आहे भांडण, धर्म, भाषा, जात पात, स्वर्ग आणि नरक त्यांना भांडूदे दोस्ता, मस्त घेउन बसु आपण एक एक क्वार्टर..., पैजारबुवा,

धर्माचे नाव वापरणर्‍याना मारा कचकून एक खेटर आम्ही कपडे सांभाळतो , तुम्ही व्हा पुढे दिवेकर !!!