अताशा मला हे असे काय होते
लेखनविषय:
अताशा असे हे मला काय होते
जराशा दुखाने नशा भंग होते
रिचवूनी आलो सागर नशेचे
पाहून थेंबही मन दंग होते
पाश रेशमी भोगले नित्य जरी
शरशय्याची अंति संग होते
शुभ्र चंदेरी वस्त्रावरी ह्या
फ़रफ़ाटलेले कृष्ण रंग होते
शिखर दिसताची कळले मला की
मिळविले मी ते, यशही सवंग होते
अताशा असे हे मला काय होते
येई अरुण परी मन निसंग होते
वाचने
1432
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
मिडलाईफ क्रायसिस हो हा. बाकी काही नाही. ;)
धन्यवाद. (मिडलाईफ म्हणाल्यासाठी!)
अँन्ड्रोपॉज म्हणायचे आहे का तुम्हाला?
बाकी अरूणजी ही गझलेच्या अंगाचे काव्य आहे काय?
मिडलाईफ क्रायसिस