Skip to main content

अताशा मला हे असे काय होते

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 23/05/2011 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा असे हे मला काय होते जराशा दुखाने नशा भंग होते रिचवूनी आलो सागर नशेचे पाहून थेंबही मन दंग होते पाश रेशमी भोगले नित्य जरी शरशय्याची अंति संग होते शुभ्र चंदेरी वस्त्रावरी ह्या फ़रफ़ाटलेले कृष्ण रंग होते शिखर दिसताची कळले मला की मिळविले मी ते, यशही सवंग होते अताशा असे हे मला काय होते येई अरुण परी मन निसंग होते
लेखनविषय:

वाचने 1434
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया