मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझे येणे

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चांदण्या राती पाहाता वाटे असे उशीत मी चंद्रच व्हावे तुझे कुशीत तुझ्या बनावे तरंग हसणार्या लाटाच नदीत जैसे तुझ्या नजरांत बोलतात ती पाने माझ्या प्रेमाच्या गातात ती गीते तुझ्या श्वासांत आहे अशी जादू मोहतात चाफ्याची कोमल फुले येताच तु जीवन होते संमोहीत घेतो मन माझे वसंता चा झोके पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी दिसतात मज नुसते तुझेच चेहरे मिठित माझ्या यावीस तु असे मध पाण्यात विसावे जैसे बहरावे जीवन माझे तुज परि तारुण्यास लागावे मोहोर जैसे चांदण्या राती पाहाता वाटे असे उशीत मी चंद्रच व्हावे तुझे कुशीत तुझ्या बनावे तरंग हसणार्या लाटाच नदीत जैसे

वाचने 1267 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रकाश१११ 12/03/2011 - 09:35
निनाव -एकदम झकास . येताच तु जीवन होते संमोहीत घेतो मन माझे वसंता चा झोके पाहातो मी आभाळात जेंव्हा कधी दिसतात मज नुसते तुझेच चेहरे आवडली

मिसळलेला काव्यप्रेमी 12/03/2011 - 20:55
मस्त!!