Skip to main content

सुंदर हसली गालावर खळी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 26/02/2011 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशिवाय काय गवसले सांग सखे तुजला हजार वेळा जरी चाचपले ह्रदय माझे शिंपला शिंपल्यातील मोती माझा वसे तुझ्या नयनांतुनी गुलमोहर बहरतो माझा तव रक्तवर्णी ओठांतुनी गुलमोहराचा बहर सारा हास्यातुन तुझिया ऊधळे मंद गंधासह फिरे वारा मंतरल्या श्वासात ऊसळे श्वासात श्वास, आरक्त नजर चेहर्‍यावर ही संध्यालाली मिटलेले ओठ, अंतरी गजर तव प्राण दाटले कर्णफुली कोवळ्या प्रितीचे गुज ऐकुनी उष्मावली तव कर्णपाळी ओठी उतावळा 'हो'कार दाबुनी सुंदर हसली गालावर खळी |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०२/२०११)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4885
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कवितेच्या प्रत्येक कडव्याची पहिली ओळ ही आदल्या कडव्याच्या शेवटच्या ओळींशी जोडून घेण्याची हातोटी आवडली.

सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद!!

कोवळ्या प्रितीचे गुज ऐकुनी उष्मावली तव कर्णपाळी ओठी उतावळा 'हो'कार दाबुनी सुंदर हसली गालावर खळी अतिशय सुंदर .. मस्त एकदम .. लिहित रहा .. वाचत आहे ...