Skip to main content

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

लेखक मयुरेश साने यांनी मंगळवार, 30/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
(व्रुत्त पंचचामर... एक लघु आणि एक गुरु या क्रमाने ...अक्षरे योजली आहेत, पहिलाच प्रयत्न आहे.) मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा..... पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........ मयुरेश साने ........दि..१६-ओक्ट-10
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1961
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अतिशय सुरेख!! शब्दच नाहीत! जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा....... जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........ हे जास्ती आवडले..

सुंदर कविता.. पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा वा

आई ग! बरच प्रभुत्व दिसतय शब्दांवर! मला काव्य बांधायला कधिच नाही जमल अन तुम्ही अगदी लघु गुरु पर्यंत .. वाव्व!

पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा मस्त जमलीय एकदम आवडली.!!

पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा? मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........ अतिशय छान

क्या बात है...............एकदम जबरी !!