Skip to main content

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?...

लेखक मयुरेश साने यांनी गुरुवार, 25/11/2010 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
पसारे तुझे आवरावे कशाला ? स्वत:ला असे सावरावे कशाला ? झोकून देतो मझ्यातला मी तुझ्यातच असे सापडावे कशाला ? जरा सांज होता तुझी याद येते पारव्याने असे गीत गावे कशाला ? तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा तुझ्यातून मी वावरावे कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ? जरा कान देण्या कळी फूल होते भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ? जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला तरीही तिने मुस्कुरावे कशाला ? मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1957
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मनाला स्पर्श करुन जाणारी कविता!

झोकून देतो मझ्यातला मी तुझ्यातच असे सापडावे कशाला ? तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ? हे शेर आवडले

मस्त

कविता आवडली एवढी प्रतिभा प्रगल्भ असताना लिहिण्याचा आळस कशाला लगे रहो

ही गजल..? सुंदर प्राजू म्हणाली तसं लाघवी कविता..!!

तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?
कोण मंद? :-( मस्त कविता! :-)