Skip to main content

टीन एज वारे वाहू लागलंय !

लेखक अथांग
Published on गुरुवार, 14/10/2010
परत एकदा टीन एज वारे अंगातून वाहू लागलंय, हुरहुर-धडधड असे राग मन- वेळी-अवेळी गाऊ लागलंय ! भेटण्याची वेळ ठरवून-बिरवून स्वप्नरंजन होऊ लागलंय, समोरा-समोर आल्यावर मात्र- लाजून लांबच राहू लागलंय ! डोळ्यात चमक, ओठांवर शिट्टी.. पाऊल तिच्याच तालात पडू लागलंय, चेहरा न दिसता हसरा तिचा, मन हिरमुसून रडू लागलंय ! लपाछपीचा नवा खेळ खेळण्यात कोण कोण बघा रमू लागलंय.. मधेच 'आउट' होण्याच्या भीतीने माझं रक्त गोठून जमू लागलंय ! टीन एजचं जगच न्यारं.. आत्ता परत पटू लागलंय.. धपापलेल मन नकळत, मागे-मागेच हटू लागलंय..:(
लेखनविषय:

याद्या 1136
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

किशोर वयातील मुलान्चे भाव-विश्व उभे केले डोळ्यासमोर !!!!! अप्रतिम काव्य !!! कविता वाचून वाचकान्चे पण मन अनेक राग गाऊ लागेल.

>>हुरहुर-धडधड असे राग मन- >>वेळी-अवेळी गाऊ लागलंय ! ह्म्म्म.. 'ते' दिवस आठवले. टीनेज मूड अगदी बरोबर पकडला आहे.