Skip to main content

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी
पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||धृ|| हिरवा शालू तूला सासू आणील ग शालूत तू खुलून दिसशील ग शालूसंगे आणायला सांग पैठणी भरजरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||१|| पाटल्या बांगड्या तूला सासरा आणील ग गळा कोल्हापुरी साज तुला करील ग वाकेसरी आणायला सांग साजा बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||२|| अनवट, मासोळ्या तूला दिर आणील ग पायी घालून तू चालशील ग गेंद, जोडवी आणायला सांग त्याच्या बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||३|| तोळबंद, वाकी तूला नणंद आणील ग हाती घालून तू काम करशील ग गोठ, बिल्वर आणायला सांग त्याच्या बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||४|| डूल, कर्णफुले तूला देराणी आणील ग कानी घालून तू मिरवशील ग लफ्फा, कुडी आणायला सांग त्याच्या बरोबरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||५|| नको सखे मला शालू अन नको मला पाटल्या ग नको मला जोडवी वाकी अन मासोळ्या ग मी माझ्या 'यांची' वाट पाहे खरी कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||६|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ११/१०/२०१०
काव्यरस

वाचने 1507
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया