मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भक्तीगीतः गणपती त्यांच्या घरी गेले

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गणपती त्यांच्या घरी गेले
गणपती त्यांच्या घरी गेले मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ|| दहा दिवस थांबले घरी आनंद आणला त्यांनी दारी पुजा अर्चनाने घर पवित्र झाले गणपती त्यांच्या घरी गेले ||१|| म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने ओवाळले निरांजन भक्तीभावाने प्रसादाचे मोदक कितीक वाटले गणपती त्यांच्या घरी गेले ||२|| हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता नाच नाचून देहभान हरपता "पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले गणपती त्यांच्या घरी गेले ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०१०

वाचने 928 वाचनखूण प्रतिक्रिया 0