मुंबई
मंडळी तुम्ही म्हणाल, सध्या सण-वारांचे दिवस, सर्वत्र उत्साही वातावरण. थोडक्यात 'आल इझ वेल' असताना, ही कुठल्या रसाची कविता का पब्लिश केली आहे? त्याचं काय आहे की अनेक सल, जखमा, व्रण वागवत आपली वाटचाल सुरु असते. जो जिवंत आहे त्याला जगणे चुकत नाही. परंतु, काल नेट वर कहीतरी शोधत/वाचत असताना मुंबईतील हल्ल्यांचा व स्फोटांचा संदर्भ आला व त्या अनुशंगाने तेंव्हा लिहीलेली ही कविता आठवली. जखमेवरची खपली निघाली व ती जखम उघडी पडली..
तुम्हाला दु:खी करण्याचा किंवा नको त्याची आठवण करून देण्याचा मानस नक्कीच नाही. तरी तसे झालेच तर माझी दिलगिरी कबुल करावी ही विनंती !
जगत असतो आपण जगासाठी
पण आत कुठेतरी रोजचे मरण...
छोट्या छोट्या सुखांसाठी,
श्वास आपले रोजच तारण !
७:३२ गाडी आली, श्वास टाकला
पळत-धावत आत शिरलो - श्वास सोडला...
अंगाला अंग, पाठीला पाठ
न थांबणार्या घामाच्या धारा त्यात--
तरी ओठांवर हलके हसू...
बॉसच्या आधी आज जागेवर असू !!!
खुशी-खुशी ऑफ़िसात शिरलो...
लिफ्ट समोर गर्दी, चांगलाच घाबरलो...
आजच साली बंद पडायची होती___
जिन्याकडे जातानाच जणु शक्ती गळाली होती...
धपापत-धडपडत जागेवर पोहोचलो,
बॉस ला तिथे बघून, चांगलाच चपापलो!
आजची ही पण संधी गेली...
हं....., आता फाईल वर, डोकं खाली !!!
शत्रूपक्षातील मित्रांच्या गाली
तरळलं असेल कुचकट स्मित...
थोडावेळ कॅन्टिन ला जाऊन
बसावं झालं चहा पित !
असाच काहीसा लळत-लोंबत दिवस संपतो..
६:१७ पकडायला मी जीव खाऊन पळत सुटतो !!!
आज लग्नाचा वाढदिवस...
पण दिवसभर झालाच त्रास,
दिन गया बात गायी, आता-
रात्री नक्कीच करू काही खास !
मनात अशा सुंदर विचारांची साखळी
आणि....
स्टेशनात शिरता-शिरता
डोळ्यासमोरून गाडी हालली.........
बोंबला ! आजचा दिवसच नाही आपला..
म्हणंत टॅक्सीवाल्याला हात करताना..
खिसा सुद्धा तपासला....
साडी ऐवजी आता फक्त फुलांवरच भागवा...
परत डोक्यात विचारांचे चक्र-------
मंतरलेली रात्र कट --
बहुदा असणार रुसवा अन फ़ुगवा !!!!
--साब, आज़ टॅक्सी बंद है
धंदा आज़कल वैसेभी मंद है !
पता नही कैसे गुज़ारा होगा?
ऐसे तो हररोज़ ही मरना होगा !!
.........
......
.....
................
.............
तू सुखरुप घरी आलास-
यात सगळं भरून पावलं...
६:१७ च्या बॉम्ब-स्फोटात----
कोणीच नाही रे वाचलं.............
माझ्या अंगातून क्षणात एक
भितीची लहर सळसळत गेली....
आणि पापणीवरचं पाणी टिपत
तिनंही मला घट्ट मिठी मारली.................................
वर्गीकरण
थरारक
ह्म्म्म
In reply to ह्म्म्म by बेसनलाडू
दाहक
In reply to ह्म्म्म by बेसनलाडू
तुमचे बोल..
>> मुंबईचे जनजीवन,
कविता आवडली अथांग
In reply to कविता आवडली अथांग by संदीप चित्रे
संदीप, कवितेमधला
(विषय दिलेला नाही)