Skip to main content

स्व प्न भं ग -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/09/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
तू हात पुढे जो केला मी दिला त्यास आधार समजून फोड तळहाती हळुवारपणे जपणार वचनास पाळण्याचा केला पक्का निर्धार चाललीस सप्तपदी तू मी कधी न अंतरणार शंकेस कधी तो थारा तू मनात ना देणार जोडीची गोडि गुलाबी ही सदैव दिसणार तू कामावरून येता तव स्वागत मी करणार कप हाती गरम चहाचा बिस्किटासवे देणार तारीख एक ती येता मी खूष अती होणार तव पगार माझ्या हाती- मी तुजभवती फिरणार ...स्वप्नातहि असले भलते तू आणु नको कुविचार - जा सांग तुझ्या बापाला मी घरजावई ना होणार ! ती केबी-फोरची संधी मी नाही दवडणार करोडपती बनण्याची मी स्वप्ने बघणार !!
लेखनविषय:

वाचने 1667
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

तारीख एक ती येता मी खूष अती होणार तव पगार माझ्या हाती- मी तुजभवती फिरणार ----- वा ! चांगली स्वप्ने आहेत .

छान कविता.
तू कामावरून येता तव स्वागत मी करणार कप हाती गरम चहाचा बिस्किटासवे देणार
हे असे करुन घरजावई व्हायचा चान्स जास्त आहे.!!

...स्वप्नातहि असले भलते तू आणु नको कुविचार - जा सांग तुझ्या बापाला मी घरजावई ना होणार ! .. पण बापच घरजावई असेल तर ?