(बाम लावला ग सखे बाम लावला)
जे गाणं ऐकल्यावर अर्धा किलो झंडूबाम खावून जीव द्यावा असं वाटलं , त्या गाण्यावर नृत्य करणार्या रबरी माकडहाडवाल्या मलैका अरोरा खान यांना सादर समर्पित :
विचित्र खाज दाटली , अभद्र ही तिथी,
मंदमती हात हे रिमोट शोधती,
दोन प्रहरी का गं उगी टिव्ही लावला ?
बाम लावला ग सखे बाम लावला.
गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने,
बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने,
बदनामीचा जणू इव्हेंट जाहला.
बाम लावला ग सखे बाम लावला.
गच्चीवर बैल दिसे , हाती वारूणी,
हंबरते म्हैस येथ उघडी अंगणी,
सभोवार रेड्यांचा डान्स चालला
बाम लावला ग सखे बाम लावला.
मारूनिया फाट्यावर सारी वैद्यके,
आद्यवैद्य जाहलीस तुच मदनिके,
भाळीचा बाम तु नितंबी लाविला,
बाम लावला ग सखे बाम लावला.
गीतसागरात मुन्नीमेरु घुसळिला,
आडमाप खान जणु शेष जाहला,
चौदावे रत्न झंडुबाम गावला .
बाम लावला ग सखे बाम लावला.
वा. डारलिंग तेरेलिये ची टिंगल
काय एकेक उपमा दिल्यात राव,
हाहाहाहाहाहाहाहा.......... मस
एकदम फस्किलास!
भारीच आहे ! सल्लूलाही आडमाप
गौरांगी वस्त्र शोधी अधीर
नवीन वस्तु
छान...