Skip to main content

विठ्ठल उभा राहीला

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 25/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठल उभा राहीला
(धृपदात थोडी आलापी घेतली आहे त्यामुळे धृपद जरा लाबंल्यासारखे वाटेल. प्रत्यक्षात विठ्ठल उभा राहीला | मी तो डोळा पाहीला || एवढेच धृपद आहे. )
विठ्ठल उभा राहीला विटेवरी उभा राहीला राहीला राहीला उभा राहीला विटेवरी विठ्ठल उभा राहीला मी तो डोळा पाहीला पाहीला पाहीला डोळा पाहीला डोळा पाहीला मी तो डोळा पाहीला ||धृ|| वाळवंटी काठी किती नाचू गावू विठ्ठल चरणी किती लिन होवू आनंदाचा पुर येई आनंदाचा पुर येई दिनांचा देव वंदिला ||१|| पापपुण्याचा हिशेब मी कसा ठेवू माउलीविणा लेकरू मी कसा राहू भोळा भाव माझा भोळा भाव माझा विठ्ठलाचरणी वाहीला ||२|| चंद्रभागेकाठी एकटा नाचलो मुखाने अभंग तालात गायलो तालामधी मुखाने अभंग गायलो साथीला येवून माझ्या साथीला येवून माझ्या प्रत्यक्ष विठ्ठल नाचला ||३|| कुडीमध्ये प्राण जपला जपला विठ्ठलाविण दुजा देव नाही केला शेवट आला आता शेवट आला आता कुडीमध्ये विठ्ठल बसला ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २५/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1186
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

सुंदर शब्दकळा