Skip to main content

अहंकार

लेखक दिलीपकुमार यांनी बुधवार, 04/08/2010 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिळवली जरी सर्व सुखे , न मिळवावा अहंकार अहंकारातुन जन्मास येतात , क्षुद्र आचार विचार. कळे न तुम्हा कधी, बदलली तुमची नीती . कधी विसरला तुम्ही , माणुसकी अन नाती. मग ते जीवन तुमचे , जीवन असणार नाही. ज्यात असेल फक्त स्वार्थ, समाधान असणार नाही . जीवन म्हणजे असावा जणु , खळखळणारा झरा . कधीच रिता होणे नाही , कितीही पाणी भरा.
लेखनविषय:

वाचने 1206
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

जीवन म्हणजे असावा जणु , खळखळणारा झरा . कधीच रिता होणे नाही , कितीही पाणी भरा.
मस्तच. ही सुद्धा आवडली. :)