तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
आटवतय तुला शेतान भात लावताना
तिरप्या डोल्यांनी म्हटलवत 'धीन ताना धीन ताना'
कालजान गीटार वाजलवत चार दीस झोपलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
खारीवर आल्तीस दुपारची लाजत होतीस
पापनीचे पल्याडशी 'मुजे रंग दे, मुजे रंग दे' बोलत होतीस
त्यादीवशी तुला रंगवताना मी दमलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
'मै तेरीच हुं' गाताना काय तुजा आवाज होता.
हरणीचे डोल्यांना पापनीचा साज होता.
त्या डोल्यात बुडलो न भायेर कदी निगलोच नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी निस्त तोंड बेसुरं वाजतय
मी बी झालोय भयरा सालं आयकुच कमी येतय
संसाराचं गान ह्ये तुजा कायव दोष नाय
चिक्कार दिस झाल बाय
तुज्या डोल्यांच गान आयकलच नाय
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
10241
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा कविता दादुस
क्या बात है दादुस!!
टाळ्या आणि
रामदास काका तो पर्यंत
In reply to टाळ्या आणि by रामदास
बाला लै
असेच म्हणतो..
In reply to बाला लै by गणपा
असेच
In reply to असेच म्हणतो.. by केशवसुमार
क्या बात है !!!
In reply to असेच by श्रावण मोडक
+१
In reply to क्या बात है !!! by मिसळभोक्ता
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच बोल्तू !
In reply to +१ by नंदन
जल्ला.....कं
+१
In reply to जल्ला.....कं by प्रभो
क्या बात् है
एकदम पिवर
बाला, एकदा
लय भारी दादुस !
:-)
मस्त
संसाराचं
बाल्या लई झ्याक......
हम्म!
mastach re bala... jyaabhana
लै भारी
रापचिक
मस्त!!
आजकाल तु डोल्यानं झालीस मुकी
लै भारी..
मस्तय :)
Surekh.
छान लिहिलय.
कविता फारशा कळत नाहीत, हि