मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'म'वाली

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बरेच दिवस शांत होतो. पण सद्ध्या माबोवर कौतुकराव शिरोडकरांनी लावलेला धडाका बघून आम्हालाही सुरसुरी आली. कौतुकरावांच्याच http://www.maayboli.com/node/14055 या सुंदर कवितेला आमचे हे विडंबन सादर समर्पित. 'बाई' ने पुरावे खुले मांडलेले... 'साहेबां'शी दुरावे किती वाढलेले.., पिपासू नेत्यांचे घसे कोरडे अन... खंड भुखंडांचे वाया चाललेले ..., वासना धनाची प्रभागास जाळी ... चरे नित्य आमदार निधीस लाभलेले, दिसे राजधानीची कवाडे मनाशी ... रडतात पुढारी, तिकीट कापलेले.., द्यावे..? घ्यावे..? कसे सिद्ध व्हावे..? सारेच प्रश्न जनपथी टांगलेले .., उठे हात दोन्ही, " कुणी होय वाली?" मन - मोहन सोनिया चरणी गुंतलेले ... ! (आता जुना झालेला) ईडंबनकार ईरसाल खोटे

वाचने 1238 वाचनखूण प्रतिक्रिया 0