मनावर दगड ठेवून म्हणालो तिला
तुझा माझा सम्बन्ध आता सम्पला
म्हणाली , हेच ऐकवण्यासाठी
जवळ केले होतेस का मला ?
आताशा एकटेपणा अक्षरशः
खायला उठतो जिवाला
पण पुन्हा तिला जवळ केले
तर घरे पडतील काळजाला
तिच्या नाही, तरी माझ्या घरचे
विरोध नक्कीच करणार
आणि त्यान्च्यापर्यन्त आमची
कुणकुण तर गेलीच असणार
आमचा समेट घडवायला
मित्र सारे आतुर झालेत
म्हणूनच रूमवरचे सारे ASH TRAY
मी केव्हाच फेकून दिलेत
(कवितेचे नाव "मोठी गोल्ड फ्लेक" ठेवणार होतो, पण मग सस्पेन्स राहिला नसता !)
वाचने
7668
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है !!!!!!
+१
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to क्या बात है !!!!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्त धुरकांडी रे!
वा रे गड्या!
सचिन..
सहमत
In reply to सचिन.. by प्राजु
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
jabrich ahe
धन्यवाद !!
छान कविता
छान..