रात्र मिलनाची ... !
मंद वार्यात,धूंद तार्यात, लाजत रात्र आली
चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली !
मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले
स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली !
शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके
लाजलेली रातराणी..., फुलवीत रात्र आली !
लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे
गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली !
नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे
रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली !
चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू
मिटले अंतर सगळे...,अन गंधीत रात्र झाली !
विशाल.
लेखनविषय:
याद्या
2933
प्रतिक्रिया
8
काव्यरस
मिसळपाव
१९७ वाचने
श्री रा रा
भगवन, क्षमस
In reply to श्री रा रा by अवलिया
मिटले अंतर
विशालभौ..
आम्ही
In reply to विशालभौ.. by हर्षद आनंदी
वा ! क्या
In reply to आम्ही by विजुभाऊ
आत्ता
In reply to वा ! क्या by टारझन