बालवाडीतल्या पुस्तकाच्या शोधात...
मी जेव्हा बालवाडीत होते... साधारण २०-२५ वर्षांपूर्वी...
तेव्हा १ लहान मुलांसाठीचे पुस्तक होते माझ्याकडे, पाठपुस्तक नव्हे!
त्यात लहान मुलांसाठी गोष्टी होत्या. पुसट पुसट आठवतायत. त्यान १ बदकाची गोष्ट होती. बदकाचे लाकडी घर - त्याला १ गोल खिडकी - त्यात ते पिवळे बदक - आणि पाऊस पडतो का काय अशी ती गोष्ट होती. नीट आठवत नाहीये. दुसर्या गोष्टीत बिस्किटे तयार करणार्या मुलीची होती. त्यात मुलीचे, तिच्या आईचे की मावशीचे, बिस्किटे की डोनट की त्यासदृश काहीतरी, गव्हांकूर यांचेही चित्र होते.
वेगळ्या प्रांतातील अनुवादीत कथा असतात तसे काहीसे होते.
मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे.
कोणाला आठवतेय का हे पुस्तक?
इडली सांबार
" अरे वा,म्हणजे तुम्ही इडल्याही करता.." पुलंची 'रविवारची (एव्हरग्रीन)कहाणी 'पाहत होते.त्यातली इडलीची रेसिपी ऐकून मला इडल्या करायची हुक्की आली..
इडली : साहित्य- १ वाटी उडीद डाळ, २.५ वाट्या उकडा तांदूळ(जर्मनीत पार बॉइल्ड राईस म्हणून एक प्रकारचा तांदूळ मिळतो तो उकड्या तांदूळासारखाच असतो बराचसा..)मीठ,तेल,हवे असल्यास १ चमचा मेथी दाणे
कृती-उडदाची डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घाला,७/८ तास.मेथी दाणे उडदाच्या डाळीत टाका.

फक्त ती सुखात राहायला हवी...
त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी
(बर्याच दिवसानी मिसळपाव वर आलेला...)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो ->
Taxonomy upgrade extras
मास्तरांची पेन्सिल स्केचेस
इथे बरेच लोक स्केचेस टाकताना दिसले म्हटले आपणही आपली जुनी स्केचेस शोधून काढावीत आणि टाकावीत.
ते इनलाईन इमेजेस कसे टाकतात ते आधी आठवेना.. नंतर कळाले...
हे काका शाहिदचे बाबा आहेत...
कॉन्ट्रॅक्ट (बहुतांशी खरी झालेली एक पद्यकथा)
कॉन्ट्रॅक्ट
चार दिवस सुट्टी होती
म्हटले जरा मौज करावी
बायकोला घेऊन सोबती
थंड हवेची सहल करावी.
थंड हवेची सहल करावी?
बायको पण खूश झाली
त्या खुशीत तिने दारूची
पॅक करू दिली बाटली
पॅक करू दिली बाटली
मी पण लिमीट पाहिली
जवळच्या दुकानातून
तीन वाइनची क्रेट घेतली
तीन वाइनची क्रेट घेऊन
निघालो मी सहलीला
स्वप्ने पाहत प्रवास झाला
करू प्रिये सह लीला
कसली प्रिये सह लीला!
पाहा अगाध दैवाची लीला
थांबवली बस अचानक
डाकूंचा घाला पडलेला
डाकूंचा घाला पडलेला
मुसंड आत चढलेला
घेतले सगळ्यांचे दागिने
पैसा अडका गोळा केला.
पैशाअडक्याचे एक सोडा
तीन क्रेट पण घेतल्या
नशा पळवून गेला
न उघडता बाटल्या
नशा पळवून ट
वैशाली (पेन-स्केच)
सगळ्यांची चित्रं पाहून मला सुद्धा हुरूप आलाय! म्हणू़न हे चित्रं.. :)
मला काडीएक चित्रकला येत नाही.. पण फॉर सम रिझन मागच्या वर्षीपासून मला चित्रं काढावीशी वाटू लागली, मी काढू लागले, व काही बरी जमली... (काही नाहीच जमली! मी काढलेल्या गरूडाला पोपट म्हणून माझ्या आज्जीनी माझा मस्त पोपट केला होता! )
तर त्यातलं हे एक.. हे पाहून काढले आहे.. मूळ चित्र भयंकर आवडलं, म्हणून लगेच वहीच्या पानावर पेनानी काढून पाहीले.. मूळ चित्राच्या जवळही जात नाही, याची मला कल्पना आहे..
'एकाक्ष' - रेखाटन.
थोडी पार्श्वभूमी - माझी आई ड्रॉईंग काढायची त्यावेळी पेन्सिली, रंग, कागद घेऊन मी काहीतरी लुडबुड करीत बसलेला असे. त्यातूनच पुढे कधीतरी चित्रांबद्दल गोडी निर्माण झाली असावी.
मला रंगीत चित्रांपेक्षा रेखाटने अधिक भावतात (कदाचित मला तेवढीच बरी जमत असावीत ;) ). काही वर्षे रेखाटने केली. पुढे कॉलेजच्या दिवसांनंतर आपसूकच तो छंद मागे पडला. आपल्या कितीतरी गोष्टी अशा व्यापातून मागे पडत गेलेल्या मला जाणवते.
कामातून सवड काढून, उसंत मिळवून असे छंद पुन्हा एकदा जोपासायला हवेत अशी प्रबळ इच्छा मनात मूळ धरुन आहे.
मिसळपाव