फकरूद्दीनची व्यथा
दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट २०१० मध्ये ओखला मार्केट येथे फकरुद्दीन ह्या किशोरवयीन मुलास अटक केली होती.त्याच्यावर एटीएम कार्ड अन २०० रुपये चोरी केल्याचे आरोप फिर्यादीने दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी महोदयांनी त्याला तिहार जेलमध्ये पाठविले.त्याला जामीन नाकारण्यात आला.९ महिन्यांनी त्याला १० हजार रु.चा जामीन मंजूर झाला.पण तेव्हढे पैसे तो भरू... शकत नसल्याने तो परत तिहारमध्ये रवाना झाला.२०० रु.चोरीची अधिकतम शिक्षा ३ महिने इतकी आहे .
मुद्दा हा आहे की.पोलीस अन न्यायाधीशांनी फक्रुद्दीनला १ वर्षे जेलमध्ये का अन कशाच्या आधारे ठेवले?
मिसळपाव