Skip to main content

श्लील अश्लील

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 18/09/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्लील अश्लील जन्मताक्षणी मी आईला विचारलं माते माझा जन्म श्लील की अश्लील माता म्हणाली बाळा श्लील रे श्लील मग मी धर्ममार्तंडांना म्हणालो मार्तंडहो माझा जन्म श्लील की अश्लील ते एकरवानं उद्गारले अश्लील अश्लील

जुन्या वस्तू

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 18/09/2011 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच लोकाना वापरलेल्या जुन्या वस्तू विकत घेण्यास आवडतात.. तर काही लोकांना ते फारसे पटत नाही..जुन्या वस्तूत मूळ मालकाच्या वासना अडकलेल्या असतात अशी एक समजूत आहे. त्याचा फटका सेकंड ओनरला बसू शकतो, विशेषतः वाहन आणि वास्तू या दोन गोष्टी जुन्या / वापरलेल्या असू नयेत असा सर्वसामान्य संकेत असतो.

भारताचे भावी पंतप्रधान...

लेखक कोदरकर यांनी रविवार, 18/09/2011 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो सध्या एक चर्चा आपल्या देशात रुजत आहे ती म्हणजे कोण असेल भारताचा भावी पंतप्रधान... राहुल गांधी चा तो जन्मसिध्द अधिकार आहे असे देशाला समजविले जात आहे आणि बहुतांश लोक हे ग्राह्य मानतात .. निदान सत्ताधारी नेते हाच विचार करत असावेत की अजुन ५ वर्ष मंत्री पद राहुल राहुल करत उप भोगावे.. जन्मसिध्द अधिकार या व्यतिरिक्त बाकी लायकी वादग्रस्त असुनही... त्यातुन च नरेन्द्र मोदी यांचे नाव ही काही जन वजनदार मानतात.. त्यांच्या मागे एक राज्य व्यवस्थित संभाळण्याचा अनुभव आणि प्रशासनावरील मजबुत पकड हा जमेचा भाग.. आज देशाला असलेली मजबुत नेत्याची गरज पाहता..

जवसाची खमंग चटणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 18/09/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ वाटी जवस/ अळशी/ Flax Seeds १२-१५ कढीपत्ता ३ टीस्पून तीळ १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून जिरेपूड मीठ व साखर चवीपुरतं तेल . पा़कृ: पॅनमध्ये थोडया तेलात (साधारण १/२ टीस्पून) कढीपत्ता तळून घ्यावा व बाजुला काढून ठेवावा. .

माझं गाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 18/09/2011 02:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझं गाव
याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी इथून पुढं लागेल माळी गल्ली, शिंपी आळी फाल्गूना
काव्यरस

नरेंद्र मोदी यांचे उपोषण

लेखक आशु जोग यांनी शनिवार, 17/09/2011 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले. काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती. १९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप. बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली. पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा वर्ल्डकप भारताने जिंकला. सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली. ४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले. ते दिल्लीमधे उपोषणाला बसले. एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला. आंदोलन प्रचंड यशस्वी.

मोर्गे सेहर - हे बुलबुलांनो उठा !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 17/09/2011 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे. का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस ! मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत !

लता मंगेशकर यांचे एक विस्मयजनक विधान

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 17/09/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिद्ध छायाचित्रकार कै.गौतम राजाध्यक्ष यांच्या एका चित्रग्रंथ- प्रकाशनाबद्दलच्या या बातमीत खालील मजकूर दिलेला आहे: ....लतादीदींनी राजाध्यक्षांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मला छायाचित्रे काढण्याचा छंद होता. तेव्हा आपल्यासारखी छायाचित्रे कोणास काढता येत नाही, असा माझा समज होता. पण, राजाध्यक्ष यांनी काढलेली छायाचित्रे पाहून माझा चेहरा पडला आणि त्यानंतर पुढे मी छायाचित्रणासाठी कॅमेरा बाहेर काढलाच नाही, असे मनोगत व्यक्त केले .... लतादीदींचे हे विधान मलातरी फार विस्मयजनक व बुचकळ्यात पाडणारे वाटते. ...

दोडक्याच्या शिरांची चटणी.

लेखक ज्योति प्रकाश यांनी शनिवार, 17/09/2011 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:-दोडक्याच्या शिरा. थोडे शेंगदाणे थोडे खवलेले खोबरे. कोथिंबीर. मिठ. चवीपुरता साखर. लिंबाचा रस. हिरवी मिरची.(ऐपतीप्रमाणे) एक चमचा तेल. कृती :-प्रथम पॅनमध्ये तेल घेऊन त्यावर शेंगदाणे घालून चांगले परतावे.