Skip to main content

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी (भाग-३)

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 17/07/2022 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
सोलापुरात चालक आणि गार्ड बदलले गेले आणि सव्वानऊला शताब्दी पुढच्या प्रवासाला निघाली. कोरोना साथीच्या भितीमुळे सर्वांचाच प्रवास कमी झाला होता. त्यामुळे सोलापूरहून गुलबर्गा, हैदराबादला जाणारी गर्दी आज दिसत नव्हती. आमच्या डब्यात बऱ्यापैकी गर्दी होती म्हणायची, पण पुढचा डबा तर पूर्ण मोकळाच होता. नाश्त्यानंतर तर बऱ्याच जणांनी मास्क उतरवलेच होते. दरम्यान, सोलापुरातून सुटत असतानाच होटगीकडून आलेली BOXN वाघिण्यांची मालगाडी शेजारच्या मार्गावर येऊन उभी राहिली होती. आतापर्यंत दुहेरीकरणाचं काम कुलालीपर्यंत पूर्ण झालेलं होतं.

किल्ला ( चित्रपट - २०१५ )

लेखक चक्कर_बंडा यांनी शनिवार, 16/07/2022 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट तब्बल सात-आठ वर्षे जुना आहे, हे लिहून ही आता बरीच वर्षे झालीत. मला या चित्रपटात काय दिसलं ते मांडायचा छोटासा प्रयत्न !