दाग अच्छे होते हैं
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...
आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)
आयटीच्या गोष्टी - नमन
आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते.
विचारणा व तोड सुचवा
मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो,
मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत.
प्रश्न !
मेणबत्या पेटवणार्यांनो तुम्ही
हातात मशाल कधी धरणार ?
चिमुरड्यांवर होणारे बलात्कार
अजुन किती काळ पाहणार ?
स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते
आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ?
भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा
राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ?
देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात
तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ?
मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार
पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ?
कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत
चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ?
जग
पावसाला बोलवायला हवे आता
पावसाला बोलवायला हवे आता
-------
तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना
तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर
कोरली होतीस
त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या
चक्रव्युहात अभिमन्यु झाला
होता माझा...
-------
अंगणातला पारिजातकही आता फारच
काकुळतीला आला आहे
तुला आठवतं?
पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
.
.
खरचं पावसाला बोलवायला हवे आता
-------
कोसळणाऱ्या धारांमध्ये
खिडकीतुन हात बाहेर काढून
ओंजळीतले छोटेसे तळे
तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर
फक्त निखळ आनंद उरायचा
माझ्या हातात
---------
कुठे दडलाय तो कुणास ठाऊक?
---------
नखशिखांत भिजल्
काव्यरस
संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल ?
संगणकावर इंटरनेट वापरताना बर्याच वेळा आपल्याला अपेक्षित वेग मिळत नाही आणी त्यामुळे आपली निराशा होते. इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेल्या युक्त्या वापरून आपल्याला इंटरनेटचा वेग वाढवला तरी देखील तो २० ते ३० टक्क्यांनीच वाढतो. परंतु इथे दिलेल्या युक्तीमुळे तुमच्या इंटरनेटचा वेग हा ५०० टक्क्यांनी नकीच वाढेल. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला संगणकावर इंटरनेट वापरताना कमी वेगाचा त्रास होणार नाही हे नक्की. आणी तुमचा अनुभव इथे सांगायला विसरू नका..!!
नवीन टुलकीट फोर मराठी टायपिंग
मार्केट मधे सध्या विकी चे नविन टुलकीट आले हे ... मालकानी ह्या कडे बगावे.
खालील धागे वर डीमो दिला आहे.
Example
Download Files
जय महाराष्ट्र ढाबा बठींडा..
छान, सुंदर हलका फुलका चित्रपट... "जय महाराष्ट्र ढाबा बठींडा".......
अभिजित खांडेकर, प्रार्थना बेहेरे... ही नवीन जोडगोळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.
नवीन फ्रेश लुक ही या अवधूत गुप्ते निर्मित चित्रपटाची मेन यु.एस. पी....
चित्रपटाची सुरुवातच आपल्या मराठमोळ्या पद्धतीने नामावलीने होते (नावं इंग्रजीत होती.. ती खटकली). पण त्याचबरोबर मराठमोळी पद्धतीच्या डिशेश दाखवल्यात, हे छान वाटलं.
पहिला सीन अभिजित खांडेकरचा फ्रेश लुक पंजाबी स्टाईलमध्ये .... (दाढी ठेवलीये ना थोडी म्हणून..). पंजाब मध्ये मराठी ढाब्याला त्याच्या एक वर्ष झालेलय..
"शत्रुघ्न"च्या निमित्ताने
श्री. मृत्युंजय यांचा "शत्रुघ्न" हा लेख वाचकांना आवडला व त्यावर प्रतिसादही भरपूर आले. रामायणातील एका अप्रसिद्ध म्हणावे अशा व्यक्तिचित्रावर लेख मीही प्रथमच बघत होतो. लेख मलाही आवडला पण वाचतांना जाणवले कीं वाल्मिकी रामायण व हा लेख यांतील तपशिलात फरक आहेत. मग रामायण काढून हे सर्ग परत वाचले. पण हे तपशीलातील फरक किरकोळ आहेत व एकूण लेखावरील त्यांच्या प्रतिपादनात त्यांनी फरक पडत नाही. शिवाय जर श्री. वल्ली यांच्यासारखी अधिकारी,अभ्यासू व्यक्ती ( हे तर संदर्भ म्हणून थेट वाल्मिकी रामायणातील संस्कृत श्लोकच देतात, मानले !) जर काही बोलत नसेल तर ते दुरुस्त करण्यातही काही हशील नव्हता.
मिसळपाव
***