Skip to main content

वाचन का करावे?

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 31/03/2016 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
"पुस्तके कशाला वाचायची? पुस्तकी ज्ञानातून कधीही जीवनाचे शिक्षण मिळत नाही" "इतरांच्या अनुभवातून आणि चुकांतून शिकण्यासाठी पुस्तके वाचावीत! त्या चुका आपण करून नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या अनुभवातून शिकायचे आहे. हे जग मोठी अनुभवाची शाळा आहे. चुका करत करत शिकणे मला आवडते! माझे स्वत:चे तत्वज्ञान मी निर्माण करणार! अनुभवातून!" "मान्य आहे. अरे पण, जीवनातल्या सगळ्याच गोष्टी स्वत:च्या चुकांतून शिकून शिकून त्यातील तत्वज्ञान कळेपर्यंत आपले वय पण वाढत जाते. समजा तुला अनुभवातून शिकत शिकत एखादी गोष्ट समजली पण तोपर्यंत त्या अनुभवाचा उपयोग करण्याचे वय आणि वेळ निघून गेली असेल तर?

पु लं चा वुडहाउस आवडणारे काका

लेखक मन यांनी गुरुवार, 31/03/2016 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज मित्राशी गप्पा सुरु होत्या.कुणीतरी वूडाहाउसचं नाव काढलय. वुडहाउस म्हणजे पी जी वुडहाउस. पुलंवर त्याचा प्रभाव होता म्हणे. पुलंचा फेव्हरिट लेखक होता म्हणे. तर त्या वुडहाउसवरुन आठवलं -- *********************पाच वर्षाचा असतानाचं आठवतय तसं************* आमच्या एका दूरच्या काकांना पी जीवूडहाउस आवडत असे म्हणे. म्हणजे ते रहायला शेजारीच होते. पण नात्यात दूरचे होते. दूरचे लोक वरिष्ठ सरकारी अधिकारी असतील तर त्यांना जवळचे करायचा प्रयत्न होतो. म्हणून सगळेच नातेवाइक त्यांना जवळचे असल्यासारखे वागवत. माझ्या बाबांहूनही बरेच मोठे असावेत वयाने.

हिवाळ्यातला लदाख - खारदुंगलाचं परमिट आणि शे गोनपा (भाग ७)

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 31/03/2016 13:22 या दिवशी प्रकाशित केले.

हिवाळ्यातला लदाख - खारदुंगलाचं परमिट आणि शे गोनपा (भाग ७)

मागील पानावरून ............ एक गोष्ट मनात सारखी टोचायला लागली कि, परवापासून इथे खालीच बसलो आहे. काल तर दिवस भर जेल च्या बाहेर पडलोच नाही. जेल मधून खारदुंग ला स्पष्टपणे दिसतो. मग का नाही खारदुंगला ला जाउन यावं? मी जर काल परमिट घेतलं असतं तर आज खारदुंगला पार करून नुब्रा घाटी ला गेलो असतो दोन दिवसा साठी. जिथे दोन कूबडाचे ऊंट पाहायला मिळाले असते. उद्या २३ तारीख आहे. उद्या दुपार पर्यंट परमिट मिळेल. २४ ला फक्त खारदुंगला पर्यंतच जाऊ शकतो.

एक दीर्घ कथा....... एकाकी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 31/03/2016 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire या कथेत चित्रकाराऐवजी दुसरा कुठलाही कलाकार व कलेचे नाव घातले तरीही चालेल. या कथेचा अर्थ हा दोन पातळ्यावर लावता येतो.

विद्यार्थ्यानी केलेले संशोधन (एक संकलन)

लेखक अत्रे यांनी गुरुवार, 31/03/2016 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
"अमुक अमुक च्या विद्यार्थ्याने लावला तमुक तमुक चा शोध" बऱ्याचदा वर्तमानपत्रात या आशयाच्या बातम्या येत असतात। त्यांचे एका ठिकाणी संकलन करावे, जेणेकरून कोणाला संशोधनात रुची निर्माण होईल/नवीन कल्पना सुचतील, या उद्देशाने हा वाहता धागा सुरु करत आहे। तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हाल अशी आशा करतो।